पाचोरा येथे डी आर एम व अधिकारी यांची पीजे बचाव कृती समिती सोबत पीजे सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा

पाचोरा येथे डी आर एम व अधिकारी यांची पीजे बचाव कृती समिती सोबत पीजे सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा

पाचोरा आज पाचोरा रेल्वे स्टेशन वर पीजे लाईन व स्टेशनची पाहणी करण्यासाठी भुसावळ विभाग डी आर एम श्री केडिया साहेब ॲडिशनल डी आर एम श्री मीना साहेब व अधिकारी वर्ग पाचोरा येथे आले असता त्यांनी पीजे बचाव कृती समितीला चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते यासंदर्भात स्टेशन मास्तर यांच्या कार्यालयात झालेल्या पीजे रेल्वे चालू काम करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली या चर्चेदरम्यान पेजेस सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डात मंजुरी मिळाली पाहिजे व त्यानंतर त्यासाठी निधी उपलब्ध झाल्यास पाचोरा ते जामनेर आहे त्या जागेवर ब्रॉडगेज चे काम सुरु करता येईल बजेटमध्ये निधी मंजूर झाल्यानंतर आम्ही ताबडतोब टेंडर काढ़न्यास करण्यास तयार आहोत त्यासाठी बजेटमध्ये निधी मंजुरीसाठी रेल्वेकडे पाठपुरावा करावा लागेल यासंदर्भात आंदोलन उभे करून शासनाला निधी मंजूर करण्यास भाग पाडणे हे स्वरूप यापुढे ठेवल्यास पीजी रेल्वे सुरू करण्याचा हेतू साध्य होऊ शकतो अशा सर्व मुद्द्यांवर साधक-बाधक चर्चा होऊन समाधानकारक माहिती मिळाली या चर्चेत पीजे बचाव कृती समिती तर्फे खलील देशमुख एडवोकेट अविनाश भालेराव सुनील शिंदे प्राध्यापक गणेश पाटील एडवोकेट अण्णासाहेब भोईटे भरत खंडेलवाल विकास वाघ नंदू सोनार आदी पदाधिकारी उपस्थित होते