मशहूर कवि साबीर मुस्तफा आबादी यांची उर्दू शाळेत भेट

मशहूर कवि साबीर मुस्तफा आबादी यांची उर्दू शाळेत भेट

खानदेश प्रदेशची लोकप्रिय व्यक्तित्व, कवी, उपन्यास कार सूत्रसंचालक साबीर मुस्तफा आबादी यांनी जिल्हा परिषद उर्दू शाळा पाचोरा येथे भेट दिली. विद्यार्थ्यांची संवाद साधला, त्यांच्या मार्गदर्शन केले, व विद्यार्थ्यांना बक्षीस ही दिले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा कार्यक्रम अंतर्गत तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांचे शाळा मार्फत स्वागत करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केले. शाळेतील शैक्षणिक कामाची पाहणी करून शिक्षकांची कौतुक केले. आजच्या वेळी जिथे उर्दु भाषा संपली जात आहे, आपण उर्दू भाषेचे संरक्षण कसे केले पाहिजे ते ही सांगितले तसेच, उर्दू भाषेत शिक्षण प्राप्त करणारे विद्यार्थी ही देशाचे प्रतिनिधित्व करत आहे अश्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला.भूतकाल मध्ये जिल्हा परिषद उर्दू शाळा पिपळगाव हरेश्वर,तालुका पाचोरा येथे आपली शेक्षणिक सेवा देणारे व सध्या नसीराबाद तालुका जिल्हा परिषद उर्दू शाळेत कार्यरत तज्ञ शिक्षक इकबाल सर यांचे शाळा पालक वर्ग मधून शेख अलीम शेख सलीम, यांच्या हस्ते शाल देवून सत्कार करण्यात आले. शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक अब्दुल एजाज यांनी आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन शेख जावेद रहीम यांनी केले.