गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल,पाचोरा येथे क्रीडा महोत्सव ( स्पोर्ट डे ) व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल,पाचोरा येथे क्रीडा महोत्सव ( स्पोर्ट डे ) व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

अभ्यासासोबत मुलांमध्ये खेळाडूवृत्ती, सांघिक भावना व एकात्मता निर्माण होण्यासाठी शिवजयंतीचे औचित्य साधून शाळेच्या प्रांगणात विविध मैदानी तसेच बैठे क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात इयत्ता नर्सरी पासून ते इयत्ता नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविला.
टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, खो-खो, रायफल शूटिंग, बॅडमिंटन यासारख्या मैदानी खेळासोबत बुद्धीला चालना देणारे चेस, टेबल टेनिस, कॅरम यासारख्या क्रीडांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन शाळेचे प्राचार्य माननीय प्रेम कुमार शामनाणी यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले.
विद्यार्थ्यांसोबत पालकांनी आनंद लुटला आणि आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक श्री दिलीप चौधरी सर, श्री अमोल देशमुख सर, श्री विनोद साळवे सर, रायफल शूटिंग प्रशिक्षक श्री योगेश पाटील सर व सौ मेघा पाटील मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना अलाहित व पर्यवेक्षिका सौ. अमेना बोहरा यांनी केले.