एस. एस .एम .एम. महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी व भूमिपुत्रांचा गुणगौरव अंकुर नियतकालिक प्रकाशन समारंभ उत्साहात

एस. एस .एम .एम. महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी व भूमिपुत्रांचा गुणगौरव अंकुर नियतकालिक प्रकाशन समारंभ उत्साहात

पाचोरा( प्रतिनिधी ) येथील एस .एस .एम .एम. महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात वेगवेगळ्या पदावर कार्यरत असलेल्या भूमिपुत्रांचा गुणगौरव व अंकुर नियतकालिक प्रकाशन समारंभ आज दिनांक 21 ऑगस्ट 2023 सोमवार रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप ओंकार वाघ होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व भूमिपुत्रांचा सत्कार विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांच्या शुभहस्ते करण्यात आला अंकुर नियतकालिक प्रकाशन पाचोरा उपविभागाचे प्रांताधिकारी मा भूषण अहिरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांच्या तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांनी साजिदा बानो शेख या विद्यार्थिनीने व माजी विद्यार्थी भूमिपुत्रांच्या वतीने डॉक्टर शामकांत देवरे यांनी आपल्या मनोगतातून संस्थेविषयी महाविद्यालयाविषयी प्राध्यापक वृंदांविषयी ऋण व्यक्त केले संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त दर्जेदार अध्यापन कसे देता येईल वेगवेगळे विविध विषयांचे कोर्सेस सुरू करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिक्षणाचा लाभ घेता येईल यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की विद्यार्थ्यांनी स्वतःचा विचार स्वतःच करायचा स्वतःच्या स्वतःच्या मनाला विचारूनच निर्णय घ्यावा मन कधी चुकीचं सांगत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचा शिल्पकार आपणच व्हावे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले. अलीकडच्या काळात शिक्षण संस्था चालवणे अवघड झालेला आहे त्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा सहभाग व लोक सहभागाची नितांत गरज आहे शासन शिक्षक प्राध्यापक कर्मचाऱ्यांच्या पगारा व्यतिरिक्त काही देण्यास तयार नाही अध्यक्ष भाषणात माजी आमदार दिलीप वाघ म्हणाले की मी सुद्धा या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ही संस्था सांभाळण्याची ची जबाबदारी आमच्यावर टाकलेली आहे दानशूर व्यक्तींच्या मदत लोक सहभाग मिळत असतो सर्व गुणवंत विद्यार्थी व भूमिपुत्रांचा मी अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो याप्रसंगी इयत्ता बारावी पास कॉमर्स सायन्स तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील टी. वाय. बी. ए., बी. एस. सी. ,बी. कॉम या वर्गातील पंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा तसेच माजी विद्यार्थी व भूमिपुत्र चा गुणगौरव यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्राध्यापक राजेंद्र चिंचोले विधानसभा सभापती यांचे सचिव सुनील वाणी, मराठी भाषा कोष सचिव डॉक्टर शामकांत देवरे, सामान्य प्रशासन सचिव क्रांती पाटील, भारतीय अभियांत्रिक रेल्वे प्रशासन सचिन महाजन, इंटेलिजन्स ब्युरो यजुद्दीन खाटीक भारतीय लोकसेवा आयोग यूपीएससी अंकित पाटील, सहाय्यक विक्रीकर आयुक्त शरद पाटील, वित्त लेखा अधिकारी सचिन परदेशी ,समाज विकास आयुक्त वर्ग एक भावेश जोशी, शासकीय आयटीआय प्राचार्य दीपक बाविस्कर, पी.एस.आय .भूषण पाटील, गौरव गोसावी ,कोण बनेगा करोडपती विजेती कुमारी किरण बोरसे ,डी मार्ट चे प्रशासकीय अधिकारी सुशीलकुमार प्रताप खैरनार .या भूमिपुत्रांचा माजी विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार आमदार सचिन तांबे यांच्या शुभहस्ते करण्यात आला याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ चेअरमन संजय वाघ चेअरमन विलास जोशी विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे प्रांताधिकारी भूषण अहिरे डी.वाय.एस.पी .धनंजय येरुडे ,पोलीस निरीक्षक राहुल खताळ कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन सुरेश देवरे ज्येष्ठ संचालक दगाजी वाघ, नानासाहेब देशमुख ,अर्जुन दास पंजाबी, सतीश चौधरी, प्रकाश पाटील, खलील देशमुख, डॉक्टर जयंतराव पाटील ,योगेश पाटील, वासुदेव महाजन ,भागचंद राखा ,प्राचार्य डॉक्टर एन एन गायकवाड ,डॉक्टर बी एन पाटील ,प्राध्यापक राजेंद्र चिंचोले, दीपक बाविस्कर, नितीन तावडे ,अंबादास गोसावी ,उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर शिरीष पाटील सूत्रसंचालन डॉक्टर प्राध्यापक अतुल सूर्यवंशी डॉक्टर प्राध्यापिका सुनीता मांडोळे प्राध्यापक माणिक पाटील आभार उपप्राचार्य डॉक्टर प्राध्यापक वासुदेव वले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक रुंद उपस्थित होते