पाचोरा न. पा. ने टॅक्स मध्ये ५० टक्के सुट देवुन नागरिकांना दिलासा द्यावा :कॉंग्रेस ची मागणी

पाचोरा न. पा. ने टॅक्स मध्ये ५० टक्के सुट देवुन नागरिकांना दिलासा द्यावा :कॉंग्रेस ची मागणी

पाचोरा (प्रतिनिधी) – कोरोना महामारी मुळे उध्वस्त झालेली व्यापारपेठ त्यामुळे शहरातील घरांचा एकत्रितकरण टॅक्स मध्ये सुट द्यावी अशी मागणी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे

कोरोना महामारीमुळे शहरातील सर्वच लहान मोठे व्यापार बंद होते त्यामुळे पाचोरा शहरातील राहणारे नागरिक हे लहान मोठे व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, कामगार असे आहेत. यातच नगर परिषद ने पुढील चार वर्ष चा एकत्रितकरण टॅक्स हा वाढविण्यासाठी नागरिकांच्या हरकती मागविल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांनी सर्व पक्षीय एकत्र बसून येत्या २०२४ पर्यंत ची घरपट्टी मध्ये ५० टक्के सुट द्यावी अशी मागणी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली असून तशी हरकत घेणार आहेत. नगर परिषदेच्या सर्व विद्यमान नगरसेवकांनी नागरींकाचा विचार करून तात्काळ घरपट्टी चा एकत्रीकरण टॅक्स पन्नास टक्के माफ करावा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत याचा जाब नगरसेवकांना विचारल्या शिवाय राहणार असेही श्री सोमवंशी यांनी म्हटले असुन कॉंग्रेस कडुन या बाबत नागरिकांना मध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचेही शेवटी श्री सोमवंशी यांनी सांगितले आहे