के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात अभियांत्रिकी विभागात फ्रेशर्स २के २४ उत्साहात
के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात अभियांत्रिकी विभागात फ्रेशर्स २के २४ उत्साहात :के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात अभियांत्रिकी विभाग तर्फे अल -गो-रिदम 2.o या संकल्पनेतून फ्रेशर्स २के २४ चे महाविद्यालयातील नवीन सभागृहात आयोजन करण्यात आले होते . फ्रेशर्स २के २४ कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख मान्यवर डॉ अमोल देशमुख व महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी संदीप केदार सोबत प्राचार्य डॉ संजय सुगंधी अकॅडमिक डीन डॉ प्रज्ञा विखार यांचे हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण एम एच १९ कॉमेडीज रील स्टार उपस्थित मंचावर हरीश नेरकर ,आदित्य पाटील ,चेतन पाटील ,भूषण परदेशी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले . विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवा, प्राध्यापकांशी आणि वर्गमित्र, मैत्रिणींसमवेत शिक्षण घेताना संवाद वाढवा, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी फ्रेशर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमा व्यतिरिक्त स्वतः उपजत असलेले सुप्तगुण व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस आर सुगंधी यांनी केले .कार्यक्रमाच्या सुरुवातीला विदयार्थ्यांनी अल्पोहारचा आनंद घेतला . दरम्यान कार्यक्रमात गायन ,नृत्य ,एकांकिका ,रॅम्प वॉक ,समुहगान ,फॅशन शो ,अश्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमात एकूण नृत्य प्रवेशिका, १९त्यात सोलो डान्स ११ व समूह नृत्य ८, तर गायन स्पर्धेत ६ ,फॅशन शो मध्ये ५० प्रवेशिका होत्या . फॅशन शो मधील विजेत्याना घोषित करण्यासाठी ४ राऊंड झाले त्यात परीक्षक प्रा. हर्षा देशमुख व प्रा. किरण पाटील होते .पहिल्या फेरीला विजय सोनवणे ,मुलांच्या फेरी मध्ये शंतनू बाविस्कर व अमित शिरसाठ, मुलींमध्ये इशा पाटील आणि कपल राऊंड मध्ये प्रथम पूजा पाटील व शंतनू बाविस्कर आणि द्वितीय प्राची विसपुते व यश पाटील विजेते घोषित झाले . सोलो डान्स मध्ये प्रथम भूमी जोशी द्वितीय इशा पाटील ,समूह नृत्य मध्ये रेट्रो गर्ल्स आणि ई अँड सी ग्रुप ने ,गायन स्पर्धेकरिता प्रथम अपर्णा खारे व द्वितीय प्रवीण चव्हाण म्हणून विजेते घोषित झाले . सर्व स्पर्धेतून द्वितीय वर्षातील विद्यार्थी मिस फ्रेशर्स शिंपी सिद्धी तर मिस्टर फ्रेशर्स प्रवीण चव्हाण तर प्रथम वर्ष विभागातून मिस फ्रेशर्स कल्याणी धनगर व मिस्टर फ्रेशर्स केतन जोशी यांची निवड झाली . उत्कृष्ट सूत्रचालन पूर्वा नेवे व दुहेरी जोडी मध्ये गौरी पाटील व राज पवार याना पारितोषिक मिळाले . सर्व विजेते विद्यार्थ्यांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आलेत .कार्यक्रमाचे आयोजन प्रा.सचिन नाथ यांनी केले . कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख ,प्राध्यापक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते .