भोरटेक येथे वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते निवृत्त सैनिकाचा सन्मान व वृक्षारोपण

भोरटेक येथे वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते निवृत्त सैनिकाचा सन्मान व वृक्षारोपण !

भोरटेक ता. भडगाव:- देशाच्या रक्षणासाठी तन – मन अर्पण करून अखंड देशसेवा करण्यासाठी सैनिक सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावत असतात.जीवाची पर्वा न करता देशासाठी सर्वस्व पणाला लावून देशसेवा करीत असतात.भोरटेक येथील *श्री. विजय संतोष बच्छे* 20 वर्षे देश सेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झाले.त्यांच्या *कार्याचा सन्मान* करण्यासाठी मा. वैशाली सुर्यवंशी यांनी त्यांच्या गावी जाऊन त्यांचा सत्कार केला.त्यासोबत गावात *वृक्षारोपण* देखील केले गावात वेगवेगळ्या झाडांची रोपे लावून निसर्गाचे संतुलन राखण्यास नक्कीच हातभार लागेल हाच यामागचा मुख्य उद्देश.
याप्रसंगी गावाच्या महिला सरपंच सौ. सुनंदा शंकर बच्छे, श्री.सुनील पुंजू महाजन श्री. उमेश देशमुख श्री.राजेंद्र संतोष धनगर श्री.शिवराम गणपत महाजन श्री.संजय बळीराम महाजन श्री.जे.के पाटील तसेच गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते.