जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध !

जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध !

(सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) ‌ महाराष्ट्राचे जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील झालेल्या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.पाथर्डीच्या तहसीलदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अॅडहोकेट प्रतापराव ढाकणे यांनी निवेदन देऊन निषेध व्यक्त केला. ढाकणे म्हणाले की भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या वाहनांवर दगडफेक, शाईफेक, करून वाहनांची तोडफोड केली.निखिल वागळे हे महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून प्रिंट मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया मध्ये निर्भिडपणे जनतेची बाजू सरकार दरबारी मांडत आहेत.मात्र आताच्या कार्यकर्त्यांना सत्य परिस्थिती वर बोलने अत्यंत झोंबत आहे.त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकारांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.ही बाब निकोप लोकशाहीचा गळा घोटणारी आहे.पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आननारी आहे.आज लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जर हल्ले होत असतील तर ही लोकशाहीची क्रुर विटंबना करुन मुस्कटदाबी केली जात आहे.ही अत्यंत लांच्छनास्पद बाब आहे. महाराष्ट्रात मागिल दोन वर्षांपासून महायुतीचे सरकार सत्तेवर आले तेव्हापासुन झुंडशाही आणि गुंडगिरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.सत्तेतील नेते नेहमीच हा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत.पुणे येथे झालेल्या निखिल वागळे यांच्या वाहनांवरील हल्ला हा पुर्वनियोजीत कटच होता असाही आरोप करण्यात आला आहे.या भ्याड हल्ल्याचा आम्ही शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने जाहीर निषेध नोंदवित आहोत.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अॅडहोकेट प्रतापराव ढाकणे, पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे,बंडू बोरुडे, भगवान दराडे, विष्णूपंत ढाकणे, सिताराम बोरूडे, देवा पवार, डॉ दीपक देशमुख, गणेश वायकर, बन्सी आठरे, देवा पवार,अतिष निर्हाळी, हुमायून आतार, गहिनीनाथ शिरसाठ, भाऊसाहेब धस, यांच्या सह अनेक गावांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पत्रकार म्हणून काम करणारे निखिल वागळे यांची गाडी पोलिस सुरक्षेत दांडेकर पुलाजवळ राष्ट्र सेवा दलाच्या “लढा लोकशाहीचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा “या विषयावर व्याख्यान देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमात पत्रकार निखिल वागळे, जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर, अॅडहोकेट असिम सरोदे,विश्वंभर चौधरी हे नियोजीत सभास्थळी जात असताना पुण्यातील डेक्कन भागात खंडोजी बाबा चौकात येताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनांवर हल्ला केला.पत्रकारीतेच्या माध्यमातून या व्यवस्थेला सडेतोड पणे प्रश्न विचारणारे निखिल वागळे यांच्या वाहनांवर हल्ला झाल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम पत्रकार बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.आज झालेला हल्ला हा लोकशाहीवर झालेला हल्ला आहे.विरोधी विचार संपवण्यासाठी झूंडशाहीचा आधार घेणे हे अत्यंत चुकीचे आहे.धिक्कार असो हल्ला करणाऱ्यांचा, दडपशाहीच्या विरोधात संविधानीक मार्गाने लढणाऱ्या प्रत्येक पत्रकारांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहेत हे अनेक वक्त्यांनी निक्षून सांगितले.पोलीसांची सुरक्षितता असतांनाही हा हल्ला झाला यावरून हा हल्ला सरकार पुरस्कृत होता की काय? अशीही देखील चर्चा राज्यभर सुरू झाली आहे.या प्रकारावरून एकंदरीतच राज्याची परिस्थिती भयावह झालेली आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायम संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या ईव्हीएम वरील निवडणूक प्रक्रियेवर बंदी घालून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यावर राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.भारतासारख्या देशात निवडणूक प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात असणे ही लोकशाहीच्या द्रुष्टीने योग्य बाब नाही असेही अॅडहोकेट प्रतापराव ढाकणे यांनी सांगितले.