महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर… वरखेडी येथील कु.माधुरी चौधरी परीक्षेत राज्यात मुलींन मधून दहावा क्रमांक पटकावला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर…
वरखेडी येथील कु.माधुरी चौधरी परीक्षेत राज्यात मुलींन मधून दहावा क्रमांक पटकावला

वरखेडी तालुका पाचोरा…
येथील कै.पुंडलिक शेठ शंकरराव चौधरी व शांताबाई पुंडलिक चौधरी यांची नात तसेच श्री.दिलीप अण्णा पुंडलिक चौधरी व सौ.प्रमिला पुंडलिक चौधरी यांची पुतणी आणि अ‍ॅडव्होकेट श्री.अशोक पुंडलिक चौधरी व सौ.सुभद्रा अशोक चौधरी यांची मुलगी तसेच श्री. निखील अशोक चौधरी यांची बहीण कुमारी माधुरी अशोक चौधरी ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकत्याच घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या परीक्षेत महाराष्ट्रातून दहाव्या क्रमांकाने यशस्वी पणे उत्तीर्ण झालेली आहे. कुमारी माधुरी हीचं बालपण वरखेडी येथे गेलेले असून जळगाव येथील एस. एस. मणियार लॉ कॉलेज येथून एल. एल. एम. पर्यंतचे शिक्षण झालेले आहे. तिची न्यायाधीश म्हणून लवकरच नियुक्ती होत आहे. तिला श्री गणेश शिरसाट सर व न्यायाधीश श्री योगेश जाधव सर तसेच मित्र मंडळी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.