पाचोरा येथील जामनेर रोडवरील नवीन बनवलेले तलाठी कार्यालय बनले शोपीस

पाचोरा येथील जामनेर रोडवरील नवीन बनवलेले तलाठी कार्यालय बनले शोपीस

पाचोरा प्रतिनिधी ( अनिल आबा येवले )

पाचोरा येथील पूर्वीपासून जामनेर रोडवरील जुने तलाठी कार्यालय गेल्या पाच वर्षापासून पडीत झाले होते त्यामुळे त्याचे नवीन बांधकाम आमदार निधीतून तयार करण्यात आले हे कार्यालय नवीन बांधून तयार झाले असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे या कार्यालयाचे लवकरात लवकर उद्घाटन होऊन विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच शेतकरी व्यापारी वर्गासाठी लवकर चालू करण्यात यावी अशी अपेक्षा असून या नवीन इमारतीचे उद्घाटन कधी होणार कोणाच्या हस्ते होणार मुख्यमंत्री साहेब का पालकमंत्री साहेब यांची वाट न पाहता हे कार्यालय त्वरित सुरू करावे कारण सध्या पोलीस स्टेशन मागे सुरू असलेले तलाठी कार्यालय कधी चालू असते कधी बंद असते वेळेचं कुठलेही त्या कार्यालयाला बंधन नाही तलाठी उपलब्ध असतात नसतात विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे उत्पन्नाच्या दाखला करतात हाल होतात वयोवृद्ध महिला पुरुष त्या ठिकाणी अकरा वाजेपासून उभे असतात उन्हाचा चटका पावसाळ्याचा फटका अशाप्रकारे नागरिकांचे हाल होतात हे हाल थांबवण्यासाठी पाचोरा तालुक्याचे आमदार यांनी त्वरित लक्ष देऊन हे कार्यालय लवकर सुरू करावे ज्याप्रमाणे कृष्णापुरी चा पुल तयार झाला असून उद्घाटनाच्या अगोदर नागरिकांसाठी खुला झाला आहे त्याचप्रमाणे हे कार्यालय सुद्धा विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनींसाठी त्वरित चालू करावे अशी अपेक्षा नागरिक करीत आहे नाहीतर तलाठी कार्यालय नवीन तयार झालेले शोपीस म्हणून लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन होत आहे याची दखल घेऊन त्वरित सुरू करावे हीच अपेक्षा