पाचोऱ्यात रविवारी महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन : माजी नगराध्यक्ष सुनीताताई पाटील यांचा उपक्रम

पाचोऱ्यात रविवारी महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन; माजी नगराध्यक्ष सुनीताताई पाटील यांचा उपक्रम

पाचोरा (वार्ताहर)दि,६
शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या मूलमंत्राला अनुसरुन पाचोरा नगरपालिकेच्या माजी अध्यक्षा तथा शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख सुनीता पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या वतीने रविवार दि ९ जुलै सकाळी १० ते दुपारी २ वाजे दरम्यान पाचोरा शहरातील आ.किशोर अप्पा पाटील यांचे निवासस्थान शेजारील ‘शिवतीर्थ’ मैदानावर शहरातील सर्व वयोगटातील महिला व तरुणींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर (हेल्थ कॅम्प) चे आयोजन केले आहे. या शिबिरात डॉ शिल्पा प्रमोद पाटील या महिलांची तपासणी करून निदान व उपचार करणार आहेत. तरी गरजू महिलांनी शिबिरापूर्वी आगाऊ नाव नोंदणी करणे आवश्यक आहे त्यासाठी संपर्क म्हणून नितीन पाटील मो.क्र.९६६५७७९७०२,राजेंद्र पाटील(राजू मामा) मो.क्र. ७७०९७७४१४०, गौरी पाटील मो.क्र.९१५८३३५३५६ या क्रमांकावर नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनंदिन कामाच्या जबाबदाऱ्या पार पडतांना व कौटूंबिक जबाबदारी पेलतांना महिला वर्गाचे आपल्या आरोग्याकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे लहानमोठे आजार बळावत जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे एकाच छताखाली महिलांच्या विविध आजारांचे निदान व उपचार मिळावेत या उद्देशाने या शिबिराचे आपण आयोजन केले असल्याची माहिती माजी नगराध्यक्षा सुनीताताई पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली असून अधिकाधिक महिलांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे,.