पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील बँक ऑफ बडोदा शाखेकडून समूह से समृद्धी या सप्ताह अंतर्गत महिला बचत गटांना कर्ज वाटप

पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील बँक ऑफ बडोदा शाखेकडून समूह से समृद्धी या सप्ताह अंतर्गत महिला बचत गटांना कर्ज वाटप

पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील बँक ऑफ बडोदा शाखा नांद्रे या शाखेकडून महिला बचत गटांना बँक मॅनेजर व्यवस्थापक श्री दिपक रामदास तोंगे व उप व्यवस्थापक श्री आदर्श कुमार यांचे हस्थे विनातरण कर्ज वाटप करण्यात आले आहे. पाचोरा तालुका येथील बँक ऑफ बडोदा शाखा नांद्रे येथे बँकेच्या “समूह से समृद्धी” हा सप्ताह अंतर्गत दिनांक ०१.०८.२०२१ ते ३०.०९.२०२१ सुरू आहे. या सप्ताह अंतर्गत नांद्रे शाखे ने परिसरातील नांद्रे, कुरंगी, वरसाडे, माहेजी, हडसन या गावामध्ये शाखा व्यवस्थापक श्री दिपक रामदास टोंगे यांनी रिजनल मॅनेजर श्री अशोक वाघेला यांचे मार्गद्शनाखाली सुमारे २१ बचत गटांना रू. २६,००,०००/- विणातरण कर्ज मंजूर करून वाटप केले गेले. बँक ऑफ बडोदा चा हा ” समूह से समृद्धी” सप्ताह परिसरातील महिला सशक्तीकरण तसेच आर्थिक व्यवहारासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जात असून बँक ऑफ बडोदा नांद्रा शाखेचे सर्वत्र कौतुक होत आहे.