कापसाला प्रतिक्विंटल दहा हजार भाव द्या शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले

कापसाला प्रतिक्विंटल दहा हजार भाव द्या शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले

पाचोरा (प्रतिनिधी) – केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाच्या निषेधार्थ पाचोरा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे आज दि.३ फेब्रुवारी २०२३ रोजी तहसील कार्यालय पाचोरा येथे सकाळी १० ते सायं ५ या वेळेत शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनाद्वारे विविध शेतकरी हिताच्या मागण्या सरकारकडे केले जाणार आहे.
या आंदोलनात कापसाला प्रतिक्विंटल दहा हजार भाव मिळावा, सोयाबीन तूर सूर्यफूल पिकाला प्रतिक्विंटल 8000 रुपये मिळावा, पंतप्रधान पिक विमा योजनेतून योग्य नुकसान भरपाई मिळावी, पाचोरा-भडगाव तालुक्यात सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई अनुदान मिळावे, शेतीपंपासाठी दिवसा पूर्ण दाबाने आठ तास वीज पुरवठा मिळावा, शेतीपंपाची मागील वीज बिलांची संपूर्ण माफी मिळावी, पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पोखरा योजना लागू करण्यात यावी, शेतकऱ्यांचे शेती कर्ज देण्यासाठीची सिबिल स्कोर ची रद्द करण्यात यावी, सेबीच्या मार्फत शेतमालाची वायदे बाजारात केलेली बंदी ताबडतोब उठवावी, शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, प्रोत्साहन पर अनुदान पात्र शेतकऱ्यांना लवकर मिळावे त्यासाठी मागील सरकारच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, जंगली जनावरांपासून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसानपोटी शासनाकडून भरीव नुकसानभरपाई मिळावी व 100% अनुदानावर सौर कुंपण योजना अंमलात आणावी, फळबागांचे मागील वर्षाची अतिवृष्टी झालेली नुकसान ची भरपाई रक्कम ताबडतोब मिळावी, मुख्यमंत्री सौर योजना व पंतप्रधान कुसुम सोलर योजनेची व्याप्ती वाढवून मागणी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मोफत सोलर पंप योजनेचा लाभ द्यावा, रोजगार हमी योजनेअंतर्गत केळी पिकासाठी मिळणारी रक्कम 3 वर्ष ऐवजी 2 वर्ष करावी आदी मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
शिवतीर्थ या शिवसेना कार्यालयापासून आंदोलनाला सुरुवात होऊन शिंदे सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत प्रांताधिकारी डॉ विक्रम बांदल साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिपक राजपूत, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, उपजिल्हाप्रमुख दिपक पाटील, मनोहर चौधरी, नरेंद्रसिंग सुर्यवंशी, रमेश बाफना, पाचोरा तालुकाप्रमुख शरद पाटील,भडगाव तालुका प्रमुख अनिल पाटील, भडगाव शहर प्रमुख शंकर मारवाडी, पाचोरा शहरप्रमुख अनिल सावंत, शहरप्रमुख दिपक पाटील, युवासेना उपजिल्हाधिकारी संदीप जैन, राजेंद्र राणा, जितेंद्र जैन, महिला आघाडीच्या तिलोत्तमा मोर्य, मंदाकिनी पारोचे जयश्री येवले अनिता पाटील, माजी नगरसेवक दत्ताभाऊ जडे, पप्पू राजपूत, दादाभाऊ चौधरी व शहर समन्वयक बंडु मोरे, युवासेना तालुकाप्रमुख भुपेश सोमवंशी , युवासेना शहरप्रमुख हरीश देवरे, जे के पाटील,गोरख पाटील, शाम महाजन, प्रशांत सोनार, गौरव पाटील, संजय चौधरी, जगदिश महाजन, जितेंद्र जैन, पप्पू जाधव, फ़ईम शेख़, अजय पाटील, महेंद्रसिंग पाटील, कैलास पाटिल, कृष्णा पाटील,अभिषेक खंडेलवाल, आनंद जैन, खंडू सोनवाने, प्रवीण पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, सुनील पाटील, महेश पाटील, समाधान पाटील, मनोहर पाटील, प्रतीक पाटील, हिमांशु पाटील, ओम पाटील, अकबर आली, संजय चव्हाण आदी पदाधिकारी सह कार्यकर्ते,महिला, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.