युवासेना उपजिल्हाप्रमुख संदिप जैन यांचा असाही प्रामाणिकपणा

युवासेना उपजिल्हाप्रमुख संदिप जैन यांचा असाही एक प्रामाणिकपणा

पाचोरा ( प्रतिनिधी )
दिनांक १२ रोजी दुपारी ४ वाजता संदिप जैन व त्यांचे मित्र विजय सोनवणे हे दुचाकीने नांद्रा येथे जात असतांना खेडगांव जवळ रस्त्यावर त्यांना मोबाईल आढळून आला त्यांनी गाडी थांबवून तो मोबाईल चालु करण्याचा प्रयत्न केला पण पासवर्ड असल्याकारणाने त्यांनी समोरच्या इसमाची कॉल येण्याची वाट बघितली त्या मोबाईल वर कॉल आला असता त्यांनी लगेच समोरचा इसमास सांगितले की दादा घाबरु नका तुमचा ॲपल कंपनीचा मोबाईल माझ्या कडे आहे आपण आपले वाहन हळू चालवून नांद्रा येथे या व आपला मोबाईल घेवून जा संदिप जैन यांनी नांद्रा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हासंघटन विनोद आप्पा बाविस्कर यांना बोलवून त्यांचा हस्ते मोबाईल म्हसावद येथील गणेश मेडीकल चे व जळगांव चे सागर भाऊ यांना मोबाईल दिला त्यांनी संदिप जैन यांचे मनापासुन आभार मानले परंतु संदिप जैन यांनी सांगितले की दादा जरी तुमची पैशाची बॅग जरी पडलेली असती व त्यावर तुमचा नंबर राहिला असता तरी ती मी परत दिली असती हि तर निर्जीव वस्तु आहे. दादा मी एका प्रामाणिक पक्षाचा कार्यकर्ता आहे. पाचोरा येथील भावी आमदार सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्रामाणिक कार्येकर्ता आहे जसे नेतृत्व आहे तसे आम्ही कार्यकर्ते आहोत आभार नका मानु माणुसकी जपा जशी मी जपली तशी आपण जपा या कार्योचे संदिप जैन यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.