लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेने तर्फे भव्य ज्येष्ठ वारकरी सन्मान सोहळा

भव्य ज्येष्ठ वारकरी सन्मान सोहळा

पाचोरा (प्रतिनिधी)
आपल्या पाचोरा येथील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेने आपल्या पाचोरा भडगांव परिसरातील जवळ जवळ 21 वारकऱ्यांना सन्मानित करण्याचे ठरवले आहे
सर्व क्षेत्रातील लोकांचा सन्मान हा नेहमी होत असतो परंतु प्रत्येक गावामध्ये सर्वसामान्य वारकरी किंवा भजनी हे आयुष्यभर गावाची सेवा करत असतात गावात सप्ताह असतो मंदिर बांधणे असो किंवा कोणाकडे भजनाचा कार्यक्रम असतो कोणी मेले तरीसुद्धा रात्रभर हे लोक भजन करत असतात परंतु हे सर्व करून सुद्धा त्यांचा नुसता साधा सन्मान देखील कोणी करत नाही म्हणूनच लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेने हा सन्मान करण्याचे ठरवले आहे
ज्यामध्ये किमान साठ वर्षावरील जेष्ठ नागरिकांचा सहभाग आहे ज्या लोकांचा किमान 30 वर्षापेक्षा जास्त परमार्थ झाला आहे आणि ज्यांनी आळंदी पंढरपूर पैठण मुक्ताबाई पायी दिंडी केले आहेत किंवा गावातल्या सप्ताहामध्ये ज्यांचा सक्रिय सहभाग असतो गावात भजन असो कीर्तन असो कुठल्याही कार्यक्रमांमध्ये ते जातीने उपस्थित राहतात परंतु या लोकांची दखल घेतली जात नाही म्हणूनच या सर्व ज्येष्ठ वारकऱ्यांसाठी 2023 चा ज्येष्ठ वारकरी पुरस्कार दिनांक 14 मे रोजी देण्यात येणार आहे
लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पाच मे पासून ते 15 मे पर्यंत भव्य असे वारकरी बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिरामध्ये जिल्ह्याभरातून 200 च्या वर मुलांनी सहभाग घेतला होता आणि गेल्या दहा दिवसापासून सर्व मुले अध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून संस्कारी होण्याचा प्रयत्न करत होते बऱ्याच मुलांचे गीतेचा पंधरावा अध्याय हा पाठांतर झाला हरिपाठ पाठ केला दररोज म्हणणारी श्लोक मंत्र निवडक अभंग वारकरी चाली आधी करून विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला दिनांक 13 मे रोजी पाचोरा शहरातून भव्य अशा दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या सर्व कार्यक्रमाला गावातील अनेक दानशूर दात्यांची सहकार्य लाभलं
सदर पुरस्कार सोहळ्यामध्ये तालुक्यातील ज्या लोकांचा सहभाग झाला आहे त्यामध्ये तारखेला येतील कै मुरलीधर मोरानकर यांना मरणा पश्चात हा पुरस्कार देण्यात येत आहे तसेच गिरड येथील पुना आप्पा पाटील तसेच श्रीराम पाटील तसेच गोंदेगाव येथील रवींद्र जिभाऊ तसेच बिलदीं येथील दगाजी महाराज आर्वे येथील चंद्रकांत महाराज शिवनी येथील विजयसिंह नाना पाटील पांढरद विनायक मामा महाराज भातखंडे येथील मदन अण्णा पाचोरा येथील शांताराम बुवा ठाकूर आमडदे येथील अशोक सुतार पिंपरी येथील किसन महाराज मांडकी येथील लक्ष्मण गुरुजी गालन येथील शंकर धोबी सामनेर येथील योगीराज आबा नगरदेवळा येथील शंकर धर्मा पाटील अंतुर्ली बुवाची येथील अंकुश आप्पा राजपूत बाळद येथील संभाजी पाटील अंजनविरे येथील रमेश पाटील पिंपरखेड येथील कैलास नेरपगार वरखेड येथील हेमराज पाटील आदीं करून वारकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या सर्व भजनी मंडळांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे तरी सदर कार्यक्रमास सर्वांनी आवर्जून उपस्थिती द्यावी असे असे आवाहन योगेश जी महाराज धामणगावकर तसेच सौ सुनीताताई पाटील पाचोरा यांनी केले आहे सर्व कार्यक्रमाचे आयोजन शहरातील वर्षभर अनाथ गोरगरिबांच्या लेकरांसाठी कार्य करणारी लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेने केले आहे आणि कार्यक्रम देखील वारकरी शिक्षण संस्थेवरच आहे