पाचोऱ्यातील धैर्यशील पाटील याची महाराष्ट्र संघात निवड

पाचोऱ्यातील धैर्यशील पाटील याची महाराष्ट्र संघात निवड

पाचोरा- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व नाशिक जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकत्याच नासिक येथे 14 वर्षाखालील बास्केटबॉल मुले राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या.

या स्पर्धेमध्ये शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा संघाने नाशिक विभागाचे नेतृत्व केले. शिंदे इंटरनॅशनल स्कूल संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत चौथ्या क्रमांकावर मजल मारली. संघातर्फे धर्यशील पाटील याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले त्याच्या या प्रदर्शनाच्या जोरावर त्याची 14 वर्षाखालील महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे.

पाचोरा तालुक्यातून प्रथमच बास्केटबॉल संघात खेळण्याची निवड झाली असून शिंदे इंटरनॅशनल स्कूल व पाचोरा नगरीत मानाचा एक तुरा रोवला गेला. त्याच्या या निवडीसाठी संस्थेचे अध्यक्ष तात्यासो पंडितराव शिंदे, उपाध्यक्ष नीरज मुनोत, सचिव ॲड. जे.डी. काटकर, सहसचिव शिवाजी शिंदे, संचालक श्री. अमोलभाऊ शिंदे, प्राचार्य डॉ. विजय पाटील, क्रीडा शिक्षक सुशांत जाधव, प्रशिक्षक जावेद शेख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.