Home जळगाव सारथी देणार जिल्ह्यातील ५०० तरूणांना रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण

सारथी देणार जिल्ह्यातील ५०० तरूणांना रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण

सारथी देणार जिल्ह्यातील ५०० तरूणांना रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण

ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

जळगाव,दि.२५ जुलै  छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी) मार्फत जिल्ह्यातील मराठा, कुणबी, मराठा – कुणबी व कुणबी – मराठा समाजाच्या ५०० तरूणांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी तरूणांनी ऑनलाईन नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वि.जा.मुकणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे‌. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी तरूणांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in/users/sarthi या संकेतस्थळावर नोंदणी करावी.

नोंदणी करतांना तरूणांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विदयालय परीसर, जी.एस.ग्राऊंड जवळ, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत (सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत) शक्य असल्यास प्रत्यक्ष अथवा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक- ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा. असे आवाहनही श्री.मुकणे यांनी केले आहे.

Don`t copy text!