गुरूकुल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा करीत आहे “रामलीला” चे आयोजन

गुरूकुल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा करीत आहे “रामलीला” चे आयोजन

दिनांक ५ ऑक्टोबर 22 रोजी दसरा( विजयादशमी) व गुरूकुल स्कूल चे प्राचार्य श्री प्रेम शामनानी यांच्या वाढदिवसा निम्मित ” रामलीला” चे आयोजन करण्यात आले आहे. ” असत्यचे अंत व सत्याचे जन्म” तसेच “पापावर पुण्याचे विजय” हे संदेश या रामलीलाच्या विविध आकर्षक दृष्यांच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला आहे. सदर रामलीला प्रयोगात गुरूकुल चे 30 ते 40 विद्यार्थी रंगमंचावर विविध भूमिका साकारणार आहेत.
जवळपास ४० वर्षानंतर पहिल्यांदा पाचोरा तालुक्यात ,कदाचित खानदेशात प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे.सिंधी कॉलनी, पाचोरा परिसरात सिंधी नवजवन सेवा मंडळातर्फे आयोजित दसरा मैदानावर रावण व कुंभकरण दहन बघण्यासाठी संपूर्ण तालुक्यातील नागरिक प्रतिसाद देतात.या वर्षी मात्र गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा तर्फेआयोजित रामलीला चे आनंद ही लुटता येणार आहे.आजच्या नवीन पिढीला पहिल्यांदा ही रामलीला प्रत्यक्ष रंगमंचावर बघायला मिळणार आहे.5 October ला संध्याकाळी 4 ते 4.30 पालकी दर्शन त्यानंतर 4.30 ते 5.30 वाजता भव्य रामलीला.तसेच 6 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.30 ते 9.30 पर्यंत रायझिंग स्टार्स ग्रुप तर्फे गीत गायन कार्यक्रम वाढदिवसा निमित्त आयोजित केला आहे.