कलामहर्षी केकी मूस कलादालन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला खासदार उन्मेश पाटील यांची सदिच्छा भेट

कलामहर्षी केकी मूस कलादालन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
खासदार उन्मेशदादा पाटील यांची सदिच्छा भेट
——————————————–

बाबूजींच्या अनमोल कलाकृती,ठेवा जपण्यासाठी अडीच कोटी खर्चातून साकारले तिन मजली अती भव्य दिव्य कलादालन
————————

चाळीसगाव – शहराचे वैभव असलेल्या जगप्रसिध्द कलामहर्षी केकी मूस कलादालनास खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आज सदिच्छा भेट देऊन कलादालनाच्या नुतन वास्तुची पाहणी केली. सुरूवातीला प्रतिष्ठानचे विश्वस्त सचिव कमलाकर सामंत यांनी भावना व्यक्त केली ते म्हणाले खासदार उन्मेशदादा पाटील यांचे मनस्वी स्वागत करतो. गेल्या 10 मे 2017 रोजी खासदार उन्मेशदादांच्याच प्रयत्नाने हे काम सुरु झाले असून सुमारे 2 कोटी 50 लाख रुपये खर्चून तीन मजली इमारत असलेले भव्य दिव्य असे कलादालन तयार झाले असून खासदार उन्मेशदादा पाटील यांचे आभार व्यक्त करीत कामाबद्दल माहिती दिली. यावेळी
हे काम पूर्णत्वास आले असून कामाच्या दर्जाबाबत मी समाधानी असून चाळीसगावकरांना या चित्रकृती पाहतांना बाबूजींच्याबद्दल दृकश्राव्य पद्धतीनं माहिती ऐकता येईल व पाहता येणारं असून लवकरच शानदार उद्घाटन सोहळा संपन्न करु त्यासाठी मी व्यक्तीश: प्रयत्नशिल असल्याची भावना खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी डी आर यू सी सी सदस्य के.बी.दादा साळुंखे, नगरसेवक चंद्रकांत तायडे, माजी नगरसेवक काका घोडे,स्टेशन सल्लागार समितीचे जेष्ठ सदस्य प्रीतमदास रावलानी, वि.हि.प. प्रखंड मंत्री विजय बाविस्कर, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील,बबनदादा पवार, जेष्ठ कार्यकर्ते संजय चौधरी,राकेश कोतकर, योगाचार्य मधुकर कासार, सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेश निकुंभ, डॉ. प्रसन्न अहिरे, अभियंता प्रविण ठोके,सारंग जाधव,अमित सुराणा, सचिन राठोड, सौरभ पाटील,ऋषिकेश पाटील, गणेश पाटील, कल्पेश मालपुरे, सुनिल रणदिवे, निकेत रणदिवे,सामाजिक कार्यकर्ते मुकेश गोसावी,कमर्शियल मॅनेजर पाठक साहेब, ए पि सिंह
श्री.मीनासाहेब, स्टेशन प्रबंधक एन पी बडगुजर,विलास मुकणे,अजय खापर्डे, तिकीट निरीक्षक श्री.देशमुख, श्री.धिवरे
गणेश मगर, जावेदसर, शेख साहेब,पोलिस निरीक्षक पि.डी. पाटील, संजय आहीरे,किसान राख, यांच्यासह विविध अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.