श्री गो. से .हायस्कूल येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी

श्री गो. से .हायस्कूल येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी

पाचोरा ( प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित. श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा .येथे आज 3 ऑगस्ट रोजी शाळेत क्रांतिसिंह नाना पाटील .यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेऊन क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे योगदान किती महत्त्वाचे होते हे मांडले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पी एम वाघ, पर्यवेक्षक आर .एल. पाटील, एन .आर .ठाकरे , ए. बी. अहिरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. तडवी , एस. एन पाटील व इतर शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सी .एल .जाधव .यांनी वक्तृत्व स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.