नांद्रा येथील सार्वजनिक शौचालयांचे उत्कृष्ट बांधकाम ग्रा.प.सदस्य योगेश सुर्यवंशी यांनी केलेल्या कार्यच सर्व स्थरातुन कौतुक

नांद्रा येथील सार्वजनिक शौचालयांचे उत्कृष्ट बांधकाम ग्रा.प.सदस्य योगेश सुर्यवंशी यांनी केलेल्या कार्यच सर्व स्थरातुन कौतुक.

वृत्तसेवा राजेंद्र पाटील नांद्रा (ता.पाचोरा)ता.29 येथील वार्ड क्रं 3 खालच्या गल्ली कडील रस्त्यावर महिलांसाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) योजने अंतर्गत सार्वजनिक महिला शौचालय बांधकाम सन 2021-2022अंतर्गत 6 सिटीचे 2युनिटत आर.सी.सी चे बांधण्यात करण्यात आले.त्यात चार साधे तर दोन इंग्लिश असे सहा शौचालय युनिटचे बांधकाम करण्यात आले.हे बांधकाम येथील युवा ठेकेदार ग्रामपंचायत सदस्य योगेश सुर्यवंशी यांनी केले आहे.त्यात नळफिटींग, पाण्याच्या व्यवस्थापनासाठी स्वता जातीने लक्ष घालून आपल्या वार्डातील महिलांच्या उघड्यावर जाण्याची समस्या दूर केली आहे.
या उत्कृष्ट कामाची दखल घेत येथील संकल्प फाउंडेशन चे अध्यक्ष , सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य किशोर प्रकाश पाटील यांनी संपूर्ण कामाची पाहणी करून ठेकेदार तथा ग्रामपंचायत सदस्य योगेश सुर्यवंशी यांचा उत्कृष्ट कामाची दखल घेत किशोर पाटील यांनी योगेश सुर्यवंशी यांचा सत्कार करुन पुढील काळात त्यांच्या हातून असेच उत्कृष्ट कामे व्हावीत या अपेक्षा व्यक्त केल्या.