श्री.गो. से.हायस्कूल पाचोरा येथे बाल चित्रकला स्पर्धा संपन्न

श्री.गो. से.हायस्कूल पाचोरा येथे बाल चित्रकला स्पर्धा संपन्न

 

 

 

 

पाचोरा ( प्रतिनिधी)

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने दिनांक 12 ऑगस्ट रोजी येथील कलादालन येथे बाल चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेविषयी आस्था व गोडी निर्माण व्हावी हा आहे कारण विद्यार्थी दशेत कला हा विषय त्याच्या जीवनातला महत्वाचा घटक आहे. यातूनच उद्याचे कलावंत तयार होत असतात. या स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे उपमुख्याध्यापक आर.एल. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षिका अंजली गोहिल, पर्यवेक्षक रहीम तडवी. कलाशिक्षक सुनील भिवसने, सुबोध कांतायन, प्रमोद

पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेचे सूत्रसंचालन सुबोध कांतायन यांनी तर आभार प्रमोद पाटील यांनी मानले.