Home महाराष्ट्र कांगोणीच्या भारत कापसे कडून ६४,००० रुपये किंमतीचे 2 गावठी कट्टे आणि 8...

कांगोणीच्या भारत कापसे कडून ६४,००० रुपये किंमतीचे 2 गावठी कट्टे आणि 8 जिवंत काडतुसे शनिशिंगणापूर परीसरात पोलिसां कडून जप्त

कांगोणीच्या भारत कापसे कडून ६४,००० रुपये किंमतीचे 2 गावठी कट्टे आणि 8 जिवंत काडतुसे शनिशिंगणापूर परीसरात पोलिसां कडून जप्त

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट मधिल गैर व्यवहार आणि बोगस नोकरांची खोगर भरती घोटाळा संपूर्ण राज्यभर गाजत असतानाच आता गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे शनिशिंगणापूर परीसरातून पोलिसांनी जप्त केली आहे. देशातील शनि भक्तांचे श्रद्धास्थान असलेले शनि शिंगणापूर हे आता गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे.त्यामुळे शनि शिंगणापूरची आता नव्याने अवैध धंदे करणारांचे “माहेरघर” ही नवीन ओळख निर्माण झाली आहे.गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे जवळ बाळगणारांच्या टोळीने जिल्हाभर धुडगूस घातला आहे.अहिल्या नगर जिल्ह्यातील अनेक गावांत या अवैध शस्त्र विकणाऱ्या टोळीने आपले पाय पसरून चांगलेच साम्राज्य निर्माण केले आहे. अवैध शस्त्र दाखवून अनेक सर्व सामान्य लोकांना धमकावण्याचे आणि लुटण्याचे सत्र या टोळीकडून सातत्याने होत आहे.अहिल्या नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील शिंगणापूर जवळ असलेल्या कांगोणी या गावातील भारत सोपान कापसे वय वर्षे (२७) याच्या कडून ६४००० रुपये किंमतीचे 2 गावठी कट्टे आणि ८ जिवंत काडतुसे शनिशिंगणापूर परीसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या अहिल्या नगर जिल्हा पोलिसांनी जप्त केली आहेत. गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे विकणाऱ्या भारत कापसे विरोधात शिंगणापूर पोलिस स्टेशनमध्ये जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने आर्म ॲक्ट ३/२५,८ प्रमाणे पोलिस नाईक बक्कल नंबर ४३७ सोमनाथ अस्मानराव झांबरे यांनी गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास हा शनिशिंगणापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक करीत आहेत.सदरची ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कीरण कबाडी, महादेव भांड, प्रशांत राठोड,रमीझराजा आतार,भगवान थोरात,विशाल तनपुरे,सोमनाथ झांबरे,शाहीद शेख,फुरकान शेख,राहुल द्वारके, दिपक मेढे यांच्या पथकाने केली आहे.जिल्ह्यात अजूनही अनेक ठिकाणी गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे यांची राजरोसपणे विक्री केली जाते. याचाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सखोल तपास करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत असे सर्व सामान्य लोकांचे म्हणणे आहे.जिल्हयातील अनेक गावात अवैध धंदे करणाऱ्या म्होरक्याच्या कमरेला गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे दिसून येत आहेत.त्यांच्याही लवकरच मुसक्या आवळल्या जातील असे आश्वासन जिल्हा पोलिस अधिकारी यांनी दिले आहे.

Don`t copy text!