पळासखेडे मिराचे तालुका जामनेर येथे राष्ट्रीय संत कर्मयोगी गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी

पळासखेडे मिराचे तालुका जामनेर दि 23/02/2023 येथे रोजी राष्ट्रीय संत कर्मयोगी गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी

संत गाडगेबाबा जन्मोत्सव रोजी सकाळी पाच वाजेपासून गावामध्ये स्वच्छता अभियान केले
गाडगेबाबा यांची शोभा मिरवणूक काढली गावामध्ये महा शिबिर घेतले कार्यक्रमांमध्ये गाडगेबाबा यांचे सामाजिक कार्याविषयी प्राध्यापक डॉक्टर रजनीताई नकुल लुंगसे यांचे व्याख्यान आयोजित केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष ईश्वर दयाराम मोरे व प्रमुख पाहुणे म्हणून सुदाम दादा पाटील. दिनकर सोनवणे रमेश लिंगायत श्याम वाघ माजी सैनिक बी आर सपकाळे जामनेर तालुका पंचायत समिती माजी सभापती चंद्रशेखर काळे सरपंच उपसरपंच चेअरमन उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर सपकाळे यांनी केले
प्रकाश सूर्यवंशी यांनी केले
आभार प्रदर्शन किशोर सपकाळ यांनी केले
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद भाऊ सपकाळे सुरेश केले सदाशिव सूर्यवंशी संदीप सूर्यवंशी बबन सूर्यवंशी अविनाश वाघ समाधान केने शशी डांबरे आणि शिंदे येडू दादा कपाटे जालिंदर चौधरी यांनी मेहनत घेतली