पैलवान स्वराज चौधरी यांस राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक

_पैलवान स्वराज चौधरी यांस राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक…!!!!_

भडगाव (प्रतिनिधी) –
कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,माध्यमिक विद्यालय,पळासखेडे ता-भडगाव येथील इयत्ता दहावीचा विद्यार्थी व किसान स्पोर्ट्स अकॕडमीचा पैलवान स्वराज प्रल्हाद चौधरी याने १४ वर्षाआतील मुलांच्या ५२ किलो वजनी गटात,क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे,जिल्हा क्रीडा संकुल,सातारा येथे आयोजीत राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत तृतीयस्थान प्राप्त करीत कांस्यपदक प्राप्त केले आहे.
स्वराज यांस पैलवान सयाजी मदने,पैलवान प्रल्हाद चौधरी, पैलवान शरद पाटील,बी.डी.साळुंखे,क्रीडा शिक्षक अमोल पाटील,प्रा.सतीश पाटील,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
स्वराजच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,सचिव डॉ.पुनमताई पाटील,मंत्रालयीन उपसचिव प्रशांतराव पाटील,विद्यालयाचे मुख्याध्यापक अभिजीत शिसोदे यांनी तसेच विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनी यांनी आनंद व्यक्त करीत त्याचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.