सामनगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न

सामनगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी) अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील सामनगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला.दिनांक 4 ते 11 मे या काळात या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.सर्व ह.भ.प.आरतीताई शिंदे,आकाश महाराज नजन, संजय महाराज बिलवाल , ज्ञानेश्वरी महाराज गुंजाळ, पल्लवीताई डोळसे,राम महाराज खरवंडीकर, हरेराम महाराज गाढे,यांची किर्तने झाली.ह.भ.प.उद्धव महाराज सबलस यांच्या काल्याच्या किर्तनाने या27 व्या वर्षातील गौरवशाली अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता झाली.अखंड हरिनाम सप्ताह काळात दररोज पहाटे काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, रामायण,हरीपाठ, हरी किर्तन इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले.सामनगाव पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते.