ललितभैय्या वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य हृदयरोग आरोग्य शिबिर व डोळ्यांच्या मोतीबिंदू शिबिरास प्रचंड प्रतिसाद

ललितभैय्या वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य हृदयरोग आरोग्य शिबिर व डोळ्यांच्या मोतीबिंदू शिबिरास प्रचंड प्रतिसाद

राजेंद्र पाटील नांद्रा(ता.पाचोरा)ता.१बांबरुड(राणीचे) येथील पंचायत समितीचे गटनेते , माजी सरपंच ललित वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले.त्यात उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने हृदयरोग आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.त्याच बरोबर न्यू माऊली नेत्रालय पाचोरा च्या वतीने नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन पी.टी.सी.चे चेअरमन नानासो . संजय वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी स्थानिक चेअरमन दगाजी वाघ युवा नेते नगरसेवक सनी वाघ , उदयोजक सूरज वाघ ,हारून देशमुख, सरपंच अस्ताना तडवी उपसरपंच मनोज वाघ , प्रदीप वाघ, अनिल वाघ,गुलाब तडवी, संदीप दरकोंडे, अशोक दरकोंडे , जगदीश वाघ, प्रकाश देसाई , बुऱ्हाण तडवी , सीताराम दरकोंडे , कलेखा मेवती, मधु कोकणे, तुकाराम काळे , भागवत गरुड यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ.अभिषेक चोपकर, डॉ.यश पाटील, डॉ.जयश जोशे, डिंपल पाटील, कुंदन बेंडाळे,सागर पवार तर माऊली नेत्रालयाचे डॉ.प्रदीप धेंडे, गोपाल नाईक, संदीप राठोड यांनी रूग्णांची तपासणी केली.नेत्र तपासणी नंतर मोफत चष्मे वाटप करण्यात आले.मोतीबींदू असलेल्या रूग्णांना ऑपरेशन पाठवण्यात आले.
सत्कारार्थी गटनेते ललित वाघ यांना विविध संस्था, पदाधिकारी, राममनोहर लोहिया माध्यमिक विद्यालयात,जि.प.शाळा, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यशस्वीतेसाठी गजानन वाघ, पुरुषोत्तम वाघ, राहुल वाघ,विवेक जावळे, आरोग्य सेविका, आशा सेविका यांनी परीश्रम घेतले.
रात्री ८वाजता राममनोहर लोहिया माध्यमिक विद्यालयात आयत पोत संख्याचे प्रविण माळी यांचे समाज प्रबोधनपर अहिराणी एकपात्री नाटक होणार आहे.