पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल ने उंचावले संपूर्ण पाचोरा तालुका व जळगाव ग्रामीण विभागाचे नाव

पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल ने उंचावले संपूर्ण पाचोरा तालुका व जळगाव ग्रामीण विभागाचे नाव

क्रीडा व युवासेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नाशिक द्वारा आयोजित विभागस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी 17 वर्षे आतील बुद्धिबळाचे सामने विभागीय क्रीडा संकुल , हिरापूर रोड, नाशिक या ठिकाणी संपन्न झाले. त्यात 17 वर्षा आतील मुलींमध्ये आदिती संतोषअलाहीत या गुरुकुलच्या विद्यार्थिनीने नाशिक विभागातून विजय मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अदितीची निवड झाली आहे.विजयी खेळाडू व तिच्या पालकांचा सत्कार गुरुकुल शाळेचे प्राचार्य श्री प्रेम शामनानी सर यांच्या हस्ते करण्यात आला. पर्यवेक्षिका सौ. अमेना बोहरा व शाळेतील शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी खेळाडूला क्रीडा शिक्षक दिलीप चौधरी सर यांचे मार्गदर्शन लाभले.
विशेष म्हणजे संपूर्ण पाचोरा तालुक्यात व जळगाव विभागात एकमेव गुरुकुल इंटरनेशनल स्कूलच्या विद्यार्थिनीने नाशिक विभागात विजय मिळवून राज्य स्तरावर प्रवेश मिळविला आहे.