हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन

हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांना
जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन

जळगाव, दि. 1 – हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, तहसीलदार सुरेश थोरात, जितेंद्र कुंवर, नायब तहसिलदार अमित भोईटे, आर. एस. पाटील यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.