कौशल्य २०२५ : राज्यस्तरीय बक्षीस वितरण सोहळा उत्साहात

कौशल्य २०२५ : राज्यस्तरीय बक्षीस वितरण सोहळा उत्साहात

 

 

नागपूर (श्री महेंद्र बेराड प्रतिनिधी):

सिटीब्रिज सॉफ्टवेअर्स प्रा. लि. व युनिव्हर्सल ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित STATE LEVEL COMPETITION (MAHARASHTRA) : KAUSHALYA 2025 – Computer Typing Speed & Computer Skill Contest या राज्यस्तरीय स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार, दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी नागपूर येथील सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल (ऑडिटोरियम) येथे उत्साहात पार पडला.

 

ही स्पर्धा जून व जुलै २०२५ मध्ये ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. या परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील ६५० गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व राज्यस्तरीय प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच संस्थाचालकांचा आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला.

 

कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. कांचनताई नितीनजी गडकरी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मा. कृष्णा खोपडे (आमदार, पूर्व नागपूर) होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये मा. श्रीकांत आंगलावे, मा. अवंतीकाताई लेकुरवाळे, मा. दिशाताई चणकापुरे, मा. रचना सिंग, मा. शीलल पीटर, मा. कश्यप सावकारकर, मा. अशोक चौधरी, मा. जितेंद्र वासनिक, मा. मनीषा अतकरे, मा. राहुल आसरे व मा. अॅड. स्वप्नील मोहरे आदी मान्यवरांचा समावेश होता.

 

सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवर, विद्यार्थी व पालकांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.

कार्यक्रमाचे संयोजन गौरव कावळे (व्यवस्थापकीय संचालक) व अभिषेक सबळ (तांत्रिक संचालक) यांनी केले होते.

 

या भव्य सोहळ्याबद्दल आयोजक संस्था व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.