प्रा. डॉ. सौ अस्मिता पाटील यांनी बांबरुड येथे हळदी कुंकू चा कार्यक्रम घेऊन भेट वस्तू देऊन सदिच्छा भेट

प्रा डॉक्टर सौ अस्मिता पाटील यांनी बांबरुड येथे हळदी कुंकू चा कार्यक्रम घेऊन भेट वस्तू देऊन सदिच्छा भेट दिली पाचोरा तालुक्यातील प्रा डॉक्टर सौ अस्मिता पाटील यांनी सामनेर लासगाव यानंतर बांबरुड येथे व त्या परिसरातील आजूबाजूच्या खेड्यातील महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन महिलांमध्ये जनजागृती निर्माण करून महिलांनीही राजकारण समाजकारण यामध्ये यावे त्यामुळे आपल्या घरातील शिकणारे मुला मुलींना त्याचा भविष्यात फायदा होईल आपण आपला संसार सांभाळून इतर क्षेत्रात राहु न संपूर्ण जगाची माहिती मिळते आता महिला सर्व क्षेत्रात पुढे जात आहे अस्मिता पाटील स्वतःचे उदाहरण सांगितले मी सुद्धा खेड्या गावात राहात होती माझ्या आई-वडिलांनी माझे शिक्षण करून मला शिक्षणासाठी जळगाव पुणे येथे पाठवल मी माझे शिक्षण पूर्ण करून प्रा डॉक्टर ही पदवी घेतली मला पहिल्यापासून समाजकारण व राजकारणाची आवड असल्यामुळे मी त्या क्षेत्रात प्रवेश केला अनेक राजकारणातील अनेक मोठे पद घेऊन समाज कार्य केले महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न केले राजकारणात मी कधी ही तडजोड न करता माझ्या तत्त्वाशी एकनिष्ठ राहिली महिलांना न्याय देणे हेच माझे उद्दिष्ट असून त्यांच्यासाठी मी 24 तास सेवा करण्यास तत्पर आहे यावेळी अस्मिता पाटील यांनी चौदाशे महिलांना हळदी कुंकू निमित्त स्टीलचे भांडे वाटप केले त्यामुळे परिसरातील महिलांनी सौ अस्मिता पाटील यांचे अभिनंदन केले