Home महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य यशवंत सेना आणि जयमल्हार शैक्षणिक आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या...

महाराष्ट्र राज्य यशवंत सेना आणि जयमल्हार शैक्षणिक आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने राज्यातील कर्तुत्ववान व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार,आपले प्रस्ताव १५ मे २०२६ पर्यंत पाठवण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य यशवंत सेना आणि जयमल्हार शैक्षणिक आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने राज्यातील कर्तुत्ववान व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार,आपले प्रस्ताव १५ मे २०२६ पर्यंत पाठवण्याचे आवाहन

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

महाराष्ट्र राज्य यशवंत सेना आणि जयमल्हार शैक्षणिक आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्था, केडगाव, अहिल्यानगर यांच्या वतीने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवा निमित्ताने राज्यातील नामांकित कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार देऊन गुणगौरव सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

जय मल्हार शैक्षणिक आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्था व यशवंत सेनेच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात येणार आहे.या

पुरस्कारा साठी आपले प्रस्ताव १५ मे २०२६ पर्यंत

पाठविण्याचे आवाहन संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना या सोहळ्यात पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक , अध्यक्ष कांतीलाल जाडकर साहेब, यांनी दिली आहे.

या जयंती महोत्सवा निमित्त सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,कृषी, सहकार,उद्योग, वैद्यकीय, प्रशासकीय तसेच पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील मान्यवर व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. समाजकारण आणि लोक कल्याणाच्या कार्याला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजन समितीने स्पष्ट केले आहे.

या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते ‘लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार’, युवा गौरव पुरस्कार,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार, रणरागिणी पुरस्कार,छत्रपती शिवाजी महाराज जीवनगौरव पुरस्कार’, “महाराष्ट्र भूषण पुरस्कार” तसेच समाज भूषण आध्यात्मिक, आरोग्य,सडेतोड पत्रकारिता, कृषीतज्ञ, उद्योजक, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, कलागौरव, कलारत्न,आदर्श शिक्षक, शिक्षिका,आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस, नगरसेवक, युवा नेते,उदयोन्मुख महिला नेतृत्व,प्रगतशिल शेतकरी,आदर्श सरपंच,आदर्श ग्रामसेवक, आदर्श किर्तनकार, आदर्श संवादक, समाजरत्न, सहकार महर्षी,सहकार सम्राट,आदर्श वारकरी,बाल किर्तनकार, आदर्श वकील,आदर्श मेंढपाळ,आदर्श वेगवान पोर्टल चॅनल, साहित्यिक , क्रिडा,आदर्श एकल महीला, सामाजिक परीवर्तन,”आदर्श अहिल्येची लेक” असे विविध पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.या सर्व पुरस्कारांचे स्वरूप सन्मानचिन्ह व प्रमाणित मानपत्र असे असणार आहे.

समाजातील सामाजिक कार्यकर्ते,लोक कल्याणकारी संस्था,नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी योग्य त्या उमेदवारांचे प्रस्ताव त्वरित पाठवावेत,असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.इच्छुकांनी संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती, त्यांच्या कार्याचा तपशील आणि आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे पीडीएफ फाईल स्वरुपात तयार करून दि. १५ मे २०२६ पर्यंत 8805922960या क्रमांकावर व्हॉटसाॅप द्वारे किंवा कांतिलाल महादेव जाडकर, रो बंगला नंबर १ ,ओंकार नगर, पाण्याच्या टाकीजवळ, केडगाव देवी, अहिल्यानगर पिनकोड ४१४००३ या पत्यावर पाठवावीत,असे कळविण्यात आले आहे.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव सोहळ्याची तारीख व कार्यक्रमाचे ठिकाण हे संयोजक समितीने पुरस्कारार्थीची निवड केल्या नंतरच सविस्तरपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे संयोजन समितीने नमुद केले आहे. समाज हितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कला गुणांना वाव मिळावा,आणि भविष्यात ही त्यांनी अतिशय जोमाने काम करत रहावे, त्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेण्याच्या उद्देशाने हा सन्मान सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक अष्टपैलू हिरे दडलेले आहेत.त्यांच्या कार्याला चकाकी देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.तरी इच्छुकांनी आपले प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावे. प्रस्तावात आपले नाव,गाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, केलेल्या कामाची सविस्तर माहिती,स्वत:चापासपोर्ट साईज फोटो,आणि केलेल्या कामाचे फोटो सह माहिती पाठवावी.

Don`t copy text!