गो.पु.पाटील महाविद्यालयाचा जय बिऱ्हाडे विभागस्तरीय कुस्तीत तृतीयस्थानी

_गो.पु.पाटील महाविद्यालयाचा जय बिऱ्हाडे विभागस्तरीय कुस्तीत तृतीयस्थानी..!!!!_

*भडगाव (प्रतिनिधी) -* कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथील इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी तथा पैलवान जय आत्माराम बिऱ्हाडे याने १९ वर्षाआतील मुलांच्या ६१ किलो वजनी गटातील क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,तर्फे आयोजीत विभागस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत तृतीयस्थान प्राप्त केले.
जय बिऱ्हाडे यांस आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,पैलवान अनिल बिऱ्हाडे,प्रा.सतीश पाटील,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
जयच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,सचिव डॉ.पुनमताई पाटील,उपसचिव प्रशांतराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामकांत पाटील,माध्यमिक सोसायटी संचालक जगदीश पाटील,प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,प्र.प्राचार्य संदीप बाविस्कर,क.म.कार्यवाहक रघुनाथ पाटील तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनी यांनी अभिनंदन करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.