गो.पु.पाटील महाविद्यालयात स्व.तात्यासाहेबांच्या २१ व्या पुण्यस्मरण सप्ताहाची सांगता

गो.पु.पाटील महाविद्यालयात स्व.तात्यासाहेबांच्या २१ व्या पुण्यस्मरण सप्ताहाची सांगता …!!!

कोळगाव ता.भडगाव – कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कला व विज्ञान महाविद्यालय,कोळगाव येथे २३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२२ दरम्यान आयोजित *स्व.कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या २१ व्या पुण्यस्मरण सप्ताहाची सांगता तात्यासाहेबांना वंदन व पुजन करुन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वती,स्व.तात्यासाहेब,स्व.कमल आजी,स्व.युवराज दादा,स्व.अशोक आण्णा,स्व.साधनाताई आदिंच्या प्रतिमेस पुष्पहार तसेच श्रीफळ वाढऊन पुजन करण्यात आले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.ए.वाघ,सुत्रसंचलन प्रा.मनोज पवार तर आभार प्रा.निलेश पाटील यांनी मानले.
आठवडाभर चालणारे सर्वच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,प्र.प्राचार्य संदीप बाविस्कर,क.म.कार्यवाहक रघुनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक-शिक्षिका,प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनींनी मेहनत घेतली.