शेतीउपयोगी साहित्य व केबल चोरटा पिंपळगाव हरे पोलिसांच्या ताब्यात

ब्रेकिंग न्युज:- शेतीउपयोगी साहित्य व केबल चोरटा पिंपळगाव हरे पोलिसांच्या ताब्यात

पिंपळगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या मोटारीच्या केबल, पत्रे,आसारी,शिडी, शेती उपयोगी साहित्य, चोरी होण्याचे प्रमाण वाढलेले असून दि.03/08/2022.रोजी शेतकऱ्यांचे शेतीचे साहित्य व घोडसगाव धरणावरील भिंतीच्या कामाचे साहित्य व पुलाच्या बांधकामाचे साहित्य तसेच शेतातील मोटारी च्या केबल,मोटारी,ठिबक च्या केबल चोरणारा संशयित आरोपी शिवानंद महाजन याला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वृत्त असे कि…पिंपळगाव हरे येथील घोडसगाव धरणावरील भिंतीच्या कामाचा ठेका व बाहुला नदीवरील पुलाच्या कामाचा ठेका
सूनिल भगवान महाजन जारगांव ता पाचोरा यांनि घेतलेलला आहे.सदर कामासाठी लागणारे साहित्य सुनील महाजन यांच्या सांगण्यावरून पिंपळगाव हरेश्वर येथील अंतिम महाजन यांनी खरेदी करून त्या वर्ती ते लक्ष ठेवत होते.पुलाचे व भिंतीचे काम पूर्ण झाल्या वर्ती अंतिम महाजन यांनी सर्व साहित्य धरणावरील असलेल्या वाटर सप्लायर च्या विहिरीजवळील एका बंद खोलीत ठेऊन कुलुप लावलेले होते.दि 2.रोजी अंतिम महाजन आपले ठेवलेले साहित्य बघण्यासाठी बघायला गेल्या नंतर तिथे खोलीला कुलुप नव्हते व सामानही नव्हता सर्व सामान चोरीला गेले असे त्यांना समजले असता त्यांनी पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन अज्ञात चोरट्या विरुद्ध तक्रार दाखल केली असता. तसेच विनोद महाजन पिंपळगाव हरे येथील शेतकरी यांची मोटारीची 70 मीटर वायरची चोरीला गेलेली होती.शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लक्ष ठेऊन चोर कोण आहे हे बघायला सुरुवात केली तर त्यात चोर हा गावातीलच शिवानंद महाजन नावाचा व्यक्ती आहे असे समजले शिवानंद महाजन याला पिंपळगाव हरे पोलिसांनी ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरु आहे.धरणातील चोरी गेलेल्या साहित्य मध्ये,लोखंडी पत्रे,आसारी,लोखंडी शिड्या,कारागिरांचे साहित्य,तसेच शेताततुन 70 मीटर वायर इत्यादी सामान आहे.अजून चौकशी.सुरू आहे.कदाचित शेतकऱ्यांच्या मोटार चोर,केबल चोर हाच असावा असे जनसामान्यातून म्हंटले जात आहे.