“प्रधानमंत्री जनकल्याण महोत्सव” महोत्सव शासकीय योजनांचा सर्वसामान्यांच्या विकासाचा

“प्रधानमंत्री जनकल्याण महोत्सव”
महोत्सव… शासकीय योजनांचा सर्वसामान्यांच्या विकासाचा
—————————————–
महोत्सवातून लोकसभेतील सहा तालुक्यात 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी, एकाच ठिकाणी, एकाच छताखाली देणार लाभ
खासदार उन्मेश दादा पाटील यांची माहिती

—————————————–
पाचोरा प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत पाचोरा व भडगाव तालुक्यांतील सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक संपन्न
——————————————
पाचोरा — शासकीय योजनांच्या लाभासाठी अनेकदा लाभार्थ्यामध्ये शासन प्रशासन यांच्यात समन्वय न झाल्याने नापसंती असते. यामुळे योजनाचा उद्देश सफल होण्यात अडचणी ठरतात. अशा प्रसंगी एकाच ठिकाणी ,एकाच छताखाली, एकाच वेळी प्रधानमंत्री जनकल्याण महोत्सव आयोजित करून प्रत्येक तालुक्यातील 75 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचा संकल्प केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीला यशस्वी आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने तसेच आजादी का अमृतमहोत्सवानिमित्त येत्या पंधरवाड्यात प्रधानमंत्री जलकल्याण महोत्सवाचे प्रत्येक तालुक्यात आयोजन करणार असल्याची माहिती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज पाचोरा येथे दिली.
त्यांच्या उपस्थितीत पाचोरा भडगाव तालुक्यांतील सर्व विभागांची आढावा बैठक संपन्न झाली. या वेळी ते बोलत होते.
सुरुवातीला प्रांताधिकारी विक्रम बादल यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पाचोरा तहसीलदार कैलास चावडे, भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे, गटविकास अधिकारी अतुल पाटील पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, शहराध्यक्ष रमेश वाणी,भडगाव शहराध्यक्ष बन्सीलाल परदेशी, जळगाव पंचायत समितीचे सदस्य ऍड. हर्षल चौधरी, मिलिंद चौधरी, भाऊसाहेब पाटील, गिरीश वराडे, सागर धनाड, सोनू कापसे, समाधान पाटील, गिरणा वॉटर कप स्पर्धा समन्वयक विजय कोळी, डॉ. संदीप पाटील यांच्यासह दोन्ही तालुक्यांतील सर्व अधिकारी उपस्थित होते.
*७५ हजार लाभार्थ्यांना लाभ देणार*
या पंतप्रधान जनकल्याण महोत्सवात ७५ योजना, ७५ स्टॉल, ७५ पुरस्कारार्थी,७५ हजार लाभार्थी आणि देशाचा ७५ वा वाढदिवस अर्थात आझादी का अमृत महोत्सव अशी आखणी करण्यात आली आहे. पाचोरा भडगाव तालुक्यासाठी शहरातील मध्यवर्ती भागात एकाच वेळी, एकाच छताखाली, एकाच ठिकाणी जनकल्याण व सांस्कृतिक महोत्सव आयोजीत करण्यात येणार आहे. *यासाठी कोणत्या योजनेचे किती उद्दिष्टे आणि किती जणांना लाभ मिळाला. ज्या लाभार्थीना अद्याप लाभ मिळालेला नाही. त्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी तयार करणे. त्यांच्या पर्यंत जाहिरात, बॅनर, हँडविल, पोंमप्लेट्स, चलचित्र व्हन द्वारा मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाणार असून पुढील पंधरवाड्यात हा महोत्सव आयोजीत करण्यात येणार आहे. अशी माहिती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी याप्रसंगी दिली
.तहसीलदार कैलास चावडे यांनी शेरोशायरी करीत प्रास्ताविक आणि आभार मानले.