कर्मवीर, तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था संचलित, गो.पु .पाटील विद्यालय कोळगाव, येथे आज गुरुवार, रोजी गणित दिन साजरा

कर्मवीर, तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था संचलित, गो.पु .पाटील विद्यालय कोळगाव, येथे आज 22/12/2022 गुरुवार, रोजी गणित दिन साजरा

दि 22/12/2022 वार गुरुवार रोजी गणित दिन साजरा करण्यात आला.
प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक, श्री. एस. एच.पाटील सर, पर्यवेक्षक, श्री. ए.एच. पवार सर उपस्थित होते.
विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षक यांनी गणित तज्ञ रामानुजन, भास्कराचार्य, माता सरस्वती व तात्या बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
दहावी ब च्या हेतल कारावाडीया व कोमल पाटील या विद्यार्थिनींनी गणितीय परिपाठ व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विद्यार्थ्यांनी गणितावर आधारित सूत्र आणि रामानुजन, भास्कराचार्य यांच्या जीवनावर आधारित भाषणे दिली.
काही विद्यार्थ्यांनी गणितीय मॉडेल तयार केली गणितीय मॉडेल्स साठी पर्यवेक्षक अनिल पवार सर, शिसोदे मॅडम, राजपूत सर यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.