थकित विज बिल न भरल्याने वीज कनेक्शन बंद केल्याचा रागातून कर्मचाऱ्याला मारहाण व सर्व कर्मचारी अधिकारी यांनी नोंदविला जाहिर निषेध

थकित विज बिल न भरल्याने वीज कनेक्शन बंद केल्याचा रागातून कर्मचाऱ्याला मारहाण व सर्व कर्मचारी अधिकारी यांनी नोंदविला जाहिर निषेध

पाचोरा- प्रतिनिधी । दोन महिन्यांपासून विज बिल थकीत असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार शहरातील बाहेरपुरा भागात एका ग्राहकाचे विज कनेक्शन बंद केल्याचा राग आल्याने विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यास मारहाण करत जिवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना आज १५ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून एका विरुध्द पाचोरा पोलिसात मारहाण, जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने व शासकीय कामात अडथळा आणला म्हणुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील मच्छी बाजार, बाहेरपुरा येथील रहिवाशी वसीम खान गुलाब खान यांचे घराचे विज बिल गेल्या दोन महिन्यांपासून थकीत आहे. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, पाचोरा येथील वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर कार्यरत असलेले प्रविण सुभाष वंजारी यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार थकीत विज बिल ग्राहकांचे विज कनेक्शन बंद करण्यासाठी १५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शहरातील मच्छी बाजार, बाहेरपुरा भागात गेले असता या भागातील रहिवासी गुलाब खान अहमद खान यांचे घरगुती वापरासाठी चे विज मीटर असुन त्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून विज बिल थकीत असल्याने विज वितरण कंपनीचे कर्मचारी प्रविण वंजारी यांनी गुलाब खान अहमद खान यांचे विज कनेक्शन बंद केल्याचा राग आल्याने गुलाब खान अहमद खान यांचा मुलगा वसीम खान गुलाब खान याने प्रविण वंजारी यांना विज कनेक्शन का बंद केले ? अशी विचारणा केली असता प्रविण वंजारी यांनी समर्पक उत्तर देवुन ही वसीम खान गुलाब खान याने प्रविण वंजारी यांना मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने विज वितरण कंपनीचे कर्मचारी प्रविण वंजारी यांचे फिर्यादीवरून मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी देत तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून वसीम खान गुलाब खान यांचे विरुध्द भा. द. वी. कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ नुसार पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपी वसीम खान गुलाब खान यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहे. या प्रसंगी सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी महावितरण ऑफ़िसला निषेध नोदविला या वेळी
तांत्रिक कामगार युनियनचे आर.आर.पाटील, विभागीय सचिव किशोर पाटील, कामगार महासंघाचे विभागीय सचिव देवचंद गायकवाड, वर्कर्स फेडरेशनचे विभागीय अध्यक्ष शरद मोरे, इंजिनिअर्स संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश नरमवार, स्वतंत्र बहुजन संघटनेचे लोखंडे, अॉपरेटर संघटनेचे चंदनकर, तसेच कार्यकारी अभियंता श्री चव्हाण, अति. कार्यकारी अभियंता शिरसाठ यांनी आपल्या मनोगतातुन सदरील घटनेचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला.