पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त अंजनाई गोशाळेत वृक्षारोपण व गोपूजन
सोयगाव, दि. २२ (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या “सेवा पंधरवड्या”च्या निमित्ताने क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था, आमखेडा (ता. सोयगाव) संचलित अंजनाई गोशाळेत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाचा प्रारंभ १७ सप्टेंबर रोजी संस्थेचे उपाध्यक्ष ईश्वर इंगळे व गणेश कापरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. यानंतर आज, २२ सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभारंभानिमित्त संस्थेच्या कोषाध्यक्षा सौ. उर्मिला इंगळे व समाजसेवक अशोक ढगे यांच्या हस्ते गोमाता पूजन पार पडले. गोमातेस गोड नैवेद्य अर्पण करून गोसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे, उपाध्यक्ष ईश्वर इंगळे, सचिव दिलीप शिंदे, संचालक अनिल लोखंडे, ज्ञानेश्वर गाडेकर, सौ. पद्मा शिंदे, सौ. रुपाली लोखंडे, सौ. मीना गाडेकर, तसेच गोशाळेचे कर्मचारी बापू ठाकरे, अनिताबाई ठाकरे, रवि ठाकरे, दत्तात्रय काटोले आणि परिसरातील अनेक ग्रामस्थ, शेतकरी व गोप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, गोसंवर्धन आणि सामाजिक जबाबदारी यासारख्या महत्वाच्या मूल्यांचा प्रभावी संदेश देण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वृक्षलागवड व गोसंवर्धनाची गरज अधोरेखित करत, अशा उपक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.