श्री.गो से हायस्कूल पाचोरा विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

श्री.गो से हायस्कूल पाचोरा विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

आज दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी डॉ. सी. व्ही. रमण यांना स्मरून राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.एन.आर.पाटील सर विज्ञान विभागाच्या प्रमुख सौ.अंजली गोहिल  मॅडम सोबत सौ.वैशाली कुमावत मॅडम,श्रीमती प्रतिभा पाटील मॅडम, श्री.प्रीतमसिंग पाटील सर, श्री. अरुण कुमावत सर, श्री. सुबोध कांतायन,श्री.संजय करंदे सर, श्री. रणजीत पाटील सर, श्री एस. एल. वाघ सर व श्री. रवींद्र बोरसे सर व सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.  कार्यक्रमात सुरवातीस सर सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेस कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री एन.आर.पाटील सर यांनी माल्यार्पण  करून कार्यक्रमास सुरुवात झाली. या कार्यक्रमात श्रेया पाटील,दुर्वा पाटील ,अपूर्वा शिंपी ,श्रुती भावसार ,नितेश राठोड, यश हटकर, खुशी सोनवणे, तेजस चौधरी, गीत महाजन , या विद्यार्थ्यांनी सर सी. व्ही. रमण यांच्या जीवनाविषयी आणि त्यांनी लावलेल्या  शोधाविषय व जीवनाविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रवींद्र बोरसे सर यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.