व्याख्यानमाल्याच्या पहिल्या दिवशी प्रचंड गर्दी, उत्साहात सुरुवात

व्याख्यानमाल्याच्या पहिल्या दिवशी प्रचंड गर्दी, उत्साहात सुरुवात

पाचोरा- येथील व्याख्यानमालाच्या पहिल्या दिवशी हुतात्मा स्मारक येथे सांगली येथून आलेले वक्ते अजित कुमार कोष्टी यांचा तुफान विनोदी नाट्य सादर करून कोरोना काळातील घडलेल्या काही गोष्टी यावर आधारित त्यांनी विनोद सादर करून नागरिकांची व महिलांची करमणूक करून मने जिंकली. यावेळी उपस्थित असलेले मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पाचोरा शहरातील असंख्य नागरिक व महिला तसेच तरुण वर्ग उपस्थित होते. यावेळी पाचोरा नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश आप्पा भोसले, नगरपालिका सहाय्यक ग्रंथपाल श्याम ढवळे लिपिक ललित सोनार ,,लायब्ररी कर्मचारी गजानन पाटील यांनी आलेले मान्यवर व पत्रकारांचा सन्मान केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित सोनार व आभार महेश कौंडिण्य यांनी मानले