Home पाचोरा तालुका आता विधानसभा निवडणुकीत क्रांती घडणार ! : वैशालीताई सुर्यवंशी

आता विधानसभा निवडणुकीत क्रांती घडणार ! : वैशालीताई सुर्यवंशी

आता विधानसभा निवडणुकीत क्रांती घडणार ! : वैशालीताई सुर्यवंशी

भडगावात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भव्य मशाल रॅली

 

*भडगाव, दिनांक 10 (प्रतिनिधी )* : आमच्या हातात निष्ठेची व स्वाभीमानाची मशाल असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदार नक्कीच क्रांती करून गद्दारांना धुळीस मिळवणार असल्याचा घणाघात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केल्या. त्या पक्षाच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या मशाल रॅलीच्या प्रारंभी बोलत होत्या.

 

क्रांती दिनाचे औचित्य साधून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भडगाव शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयातून रॅली सुरू झाली. प्रारंभी महापुरूषांना वंदन करण्यात आले. याप्रसंगी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी उपस्थितांना संबोधित करतांना सत्ताधाऱ्यांवर कडाडून प्रहार केले. मतदारसंघात कोणतीही कामे झाली नसून फक्त आभास दाखविण्यात येत असल्याची टिका त्यांनी केली.

 

दरम्यान, जोरदार जयघोष करत भडगाव शहरातून भव्य मशाल रॅली काढण्यात आली. एसटी स्टँड, तहसील कार्यालय, बालाजी गल्ली, जागृती चौक, शनि चौक, बाजार चौक, खोल गल्ली, दत्ता आबा शॉपींग सेंटर या मार्गाने ही रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी रॅलीचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले.

 

या रॅलीत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख सुनील पाटील, नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासह, युवासेना, महिला तसेच अन्य आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Don`t copy text!