आरीज बेग मिर्झा जळगाव जिल्हा काँग्रेस प्रभारी

आरीज बेग मिर्झा जळगाव जिल्हा काँग्रेस प्रभारी

 

(पाचोरा तालुका प्रतिनिधी अनिल आबा येवले) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री.आरीज बेग मिर्झा यांची जळगाव जिल्ह्याचे प्रभारी म्हणून प्रदेशाध्यक्ष मा.श्री.हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी नियुक्ती केली आहे. आर्णी जि.यवतमाळ येथील माजी नगराध्यक्ष व युवक काँग्रेसच्या माजी प्रदेश सरचिटणीस पदासह पक्ष संघटनेचा दीर्घ अनुभव असलेले प्रदेश उपाध्यक्ष आरीज बेग मिर्झा यांची जळगाव जिल्हा प्रभारी पदी तसेच विधानसभा निहाय काँग्रेस पदाधिकाऱ्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केल्याबाबतचे पत्र प्रदेश काँग्रेस कडून जळगाव जिल्हा काँग्रेस ला पाठविण्यात आले आहे. चोपडा विधानसभेचे प्रभारी प्रभारी म्हणून श्री संजय उमरकर (बुलढाणा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच अमळनेर- श्री किशोर कदम, रावेर- श्री डॉ.अरविंद कोलते (सरचिटणीस, म.प्र.काँ.कमिटी), भुसावळ- श्री रामविजय बुरुंगले (सरचिटणीस, म.प्र.काँ.कमिटी), जळगाव – श्री प्रकाश पवार (नाशिक), एरंडोल – श्री प्रकाश पाटील (माजी जि.प.अध्यक्ष, बुलढाणा), चाळीसगाव – श्री रणजितसिंग पवार (धुळे), मुक्ताईनगर श्री तुळशीराम नाईक (बुलढाणा) तर पाचोरा व जामनेर विधानसभेची जवाबदारी आरीज बेग यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. स्थानिक निवडणुकींच्या आधी झालेल्या या नियुक्त्यांचे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून लवकरच प्रभारींच्या बैठका व दौरे आयोजीत करण्यात येणार असल्याचे जिल्हाकार्याध्यक्ष अविनाश भालेराव यांनी सांगितले.