रेन वॉटर हार्वेस्टिंगसंबंधी महानगरपालिकेचे नवीन धोरण

रेन वॉटर हार्वेस्टिंगसंबंधी महानगरपालिकेचे नवीन धोरण
इमारतीचे छत आकारमानानुसार वाढले मनपा प्रोत्साहनपर अनुदान
बोअरवेलधारक,विहीरी असणारी घरे, मोठ्या इमारतींना(अपार्टमेंट) रेन वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य , रेन वाटर हार्वेस्टिंग न केल्यास 20 हजार रुपये दंड आकारणी

चंद्रपूर – रेन वॉटर हार्वेस्टिंगसंबंधी महानगरपालिकेचे नवीन धोरण ठरविण्यात आले असुन इमारतीचे आकारमानानुसार वाढीव अनुदान दिले जाणार आहे तसेच बोअरवेलधारक,विहीरी असणारी घरे, मोठ्या इमारतींना(अपार्टमेंट) रेन वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य असुन सदर इमारतधारकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग न केल्यास २००००/- रुपये दंड आकारण्यात येणार असुन सदर रक्कम मालमत्ता कराची थकबाकी म्हणुन वसुल करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या नवीन धोरणानुसार १००० चौ. फुट पर्यंतच्या इमारती क्षेत्राला ५०००/- , १००१ ते २००० चौ. फुट क्षेत्राला ७०००/- रुपये तर २००१ पुढील चौ. फुट क्षेत्राला १०,०००/- रुपये प्रोत्साहनपर अनुदान तसेच पुढील ३ वर्षांपर्यंत २ टक्के मालमत्ता करत सुट महानगरपालिकेतर्फे देण्यात येणार आहे.
शहरातील सर्व बोअरवेलधारक,विहीरी असणारी घरे, मोठ्या इमारतींना(अपार्टमेंट) रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे अनिवार्य आहे, अश्या इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेली नसल्याची आढळुन आल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यासंबंधी सदर इमारतधारकांना दूरध्वनी, एसएमएस, व्हॉइस मॅसेजद्वारा सुचित करण्यात येत असुन कारवाई टाळण्यास येत्या १५ दिवसात रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
रेन वॉटर हार्वेस्टींग उपक्रमास इको प्रो, रक्षण धरणी मातीचे, रोटरी क्लब इत्यादी विविध संस्थांद्वारे मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत असुन विविध स्तरातील इच्छुक व्यक्तींकडुन सक्रीय सहभाग दर्शविला जात आहे.