कु.श्रध्दा पाटील व चि.अमन पिंजारी यांचा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेतील यशाबद्दल गौरव

कु.श्रध्दा पाटील व चि.अमन पिंजारी यांचा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेतील यशाबद्दल गौरव…!!!!!!

भडगाव (वार्ताहर) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,न्यू इंग्लिश मेडियम स्कूल,बाळद रोड,भडगावची विद्यार्थिनी तथा किसान स्पोर्ट्स अकॕडमीची खेळाडू कु.श्रध्दा पाटील हिने जळगाव पोलिस स्पोर्ट्स अकॕडमी,स्केटींग कोर्ट,जळगाव येथे आयोजित जिल्हास्तरीय स्पीड स्केटींग १४ वर्षाआतील मुलींच्या प्रथम येऊन नाशिक विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्याबद्दल तसेच गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथील इयत्ता १२ वी विज्ञान चा बॉक्सर खेळाडू अमन मुसा पिंजारी याने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल,जळगाव येथे जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय १९ वर्षाआतील बॉक्सींग स्पर्धेत ६६ किलो वजनी गटात तृतीयस्थानावर झेप घेत यश संपादन केले,दोघी खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन तथा जिल्हा बँक संचालक नानासाहेब प्रतापराव पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला,यावेळी प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,प्राचार्या विद्या पवार,प्राचार्य ए.एस.पाटील,मुख्याध्यापक अरुण बागुल,मुख्याध्यापक अभिजीत शिसोदे आदि उपस्थित होते.
स्पर्धेत यशस्वी खेळाडूंना राष्ट्रीय स्केटींग प्रशिक्षक सुनिल मोरे,आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,प्रा.सतीश पाटील,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी,आतिक साटोटे,लिपीक संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
श्रध्दा व अमनच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन तथा जिल्हा बँक संचालक आदरणीय नानासाहेब प्रतापराव पाटील,संस्थेच्या सचिव तथा दूध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पुनमताई पाटील,अव्वर सचिव प्रशांतराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामकांत पाटील,प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,सुरेश गुजेला,प्राचार्या विद्या पवार,क.म.कार्यवाहक रघुनाथ पाटील,प्रभारी प्राचार्य संदीप बाविस्कर तसेच प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करीत,अभिनंदन केले आहे.