राष्ट्रीय चर्मकार महासंघ पाचोरा तालुका वतीने आदर्श पोलीस पाटील श्रीमती भारती बेंडाळे-सावंत यांचा सत्कार
आज दिनांक ०४ रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघ पाचोरा तालुका व शहर च्या वतीने नुकतेच आदर्श महिला पोलीस पाटील,श्रीमती भारती बेंडाळे-सावंत,कृष्णापुरी-पाचोरा शहर यांचा सत्कार एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आला याप्रसंगी कर्मचारी आघाडी जिल्हाध्यक्ष श्री बी बी मोरे आप्पा,कर्मचारी आघाडी शहराध्यक्ष अण्णासाहेब प्रकाश रोझतकर,तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे,तालुका सचिव श्री उमेश सोनवणे,तसेच गाळण बु सरपंच श्री राजेन्द्र सावंत,चि जयेश सावंत उपस्थित होते यावेळेस जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय चर्मकार महासंघ जेष्ठ नेते श्री अनिल सावंत सर यांची कन्या कु गायत्री सावंत हिस ८७:५०% मिळाल्याबद्दल तिचे देखील अभिनंदन व कौतुक करण्यात आले
श्रीमती भारती बेंडाळे-सावंत या सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय चर्मकार महासंघ चे जेष्ठ नेते यांच्या पत्नी असून कु गायत्री सावंत ह्या त्यांच्या कन्या आहेत