गोपीचंद पुना पाटील,विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत दैदिप्यमान यश

गोपीचंद पुना पाटील,विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत दैदिप्यमान यश….!!!!!!

भडगाव (वार्ताहर) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत, गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथील मल्लांनी जिल्हा क्रीडा कार्यालय व भडगाव तालुका क्रीडा समितीतर्फे आयोजित तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत १४ खेळाडूंनी विविध गटात विजयश्री प्राप्त करीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे….!!!!

१४ वर्षाआतील (मुले)

रुपेश विनोद पाटील (३५ कि.प्रथम)
कमलेश मनोज हिरे (३८ कि.प्रथम)
लतिकेश पुंडलीक पाटील (४१ कि.प्रथम)
रोहन भरत पवार (५२ कि.द्वितीय)

१७ वर्षाआतील,फ्रीस्टाईल (मुले)

कृष्णा सुनिल पाटील (४१ कि.प्रथम)
धीरज शरद पाटील (५१ कि.प्रथम)
अक्षय भगवान माळी (७१ कि.प्रथम)
लक्ष्मण रामकृष्ण महाजन (५५ कि.द्वितीय)

१७ वर्षाआतील ग्रीकरोमन (मुले)

निवृत्ती ईश्वर पवार (५१ कि.प्रथम)
निखिल शरद पाटील (४८ कि.प्रथम)
तुषार सावता पाटील (४१कि.प्रथम)

१७ वर्षाआतील (मुली)

कु.पायल कैलास सोनवणे (४६ कि.प्रथम)

१९ वर्षाआतील फ्रीस्टाईल (मुले)

जय आत्माराम बिऱ्हाडे (६१ कि.प्रथम)

१९ वर्षाआतील ग्रीकरोमन (मुले)

योगेश सुरेश ठेंगे (६० कि.प्रथम)
शुभम राजेंद्र पाटील (५५ कि.प्रथम)

१९ वर्षाआतील (मुली)

कु.पायल दौलत पाटील (५० कि.प्रथम)

स्पर्धेत घवघवीत यश मिळवणाऱ्या खेळाडूंना आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,प्रा.सतीश पाटील,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन तथा जिल्हा बँक संचालक आदरणीय नानासाहेब प्रतापराव पाटील,संस्थेच्या सचिव तथा दूध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पुनमताई पाटील,अव्वर सचिव प्रशांतराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामकांत पाटील,प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,क.म.कार्यवाहक रघुनाथ पाटील,प्रभारी प्राचार्य संदीप बाविस्कर तसेच शिक्षक-शिक्षकेतर,प्राध्यापक-प्राध्यापिका आदिंनी आनंद व्यक्त करीत व अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.