तिसगाव जिल्हा परिषद गटातील युवा नेते कुशल भापसे आणि आमदार राजळे यांची निवडणूकी पुर्वीच षटकार मारीत जोरदार फलंदाजी

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
साऱ्या विश्वाला खेळाचे वेड लावून गोल मैदानावर खेळ खेळत सर्व जगाला काखेत घेतलेल्या क्रिकेट या खेळाचा अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथे शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला.शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते या खेळाचे उद्घाटन संपन्न झाले.मांडवेश्वर क्रिकेट क्लब आणि कुशलदादा भापसे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या क्रिकेट स्पर्धेचे पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथे आयोजन करण्यात आले आहे.माजी खासदार स्वर्गिय बाळासाहेब विखे पाटील,माजी केंद्रीय मंत्री नामदार गोपिनाथराव मुंडे साहेब,माजी आमदार स्व.राजीवजी राजळे,माजी आमदार स्व.शिवाजीराव कर्डिले साहेब, माजी आमदार बाबुरावजी भापसे,स्व.प्रमोद भापसे पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.फक्त तिसगाव जिल्हा परिषद गटातील,माळी बाभुळगाव गण व तिसगाव गणातील क्रिकेट संघांनाच या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.पहिले बक्षीस ३३,३३३ रूपये, दुसरे बक्षीस २२,२२२ रूपये,तिसरे बक्षीस ११,१११ रुपये,चौथे बक्षीस ७,७७७ रूपये,पाचवे बक्षीस ५,५५५ रूपये ठेवण्यात आले आहे.त्या सोबतच विजयी संघांना ट्राॅफीही देण्यात येणार आहे.प्रथम नारळ फोडून या स्पर्धेचा बलून हवेत सोडण्यात आला.नंतर आमदार मोनिकाताई राजळे आणि युवा नेते कुशल भापसे यांनी जोरदार षटकार मारून या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केले.आगामी जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीची फलंदाजी करण्या आधीच ही क्रिकेटची फलंदाजी करत नेत्यांनी जोरदार षटकार बाजी केली आहे. तिसगाव जिल्हा परिषद गटात महायुती तर्फे फलंदाजी करताना विरोधकांचा त्रिफळा उडवण्या साठी ही आगामी राजकीय रणनीती सुरू झाली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणूकी विषयी विरोधी गटात सामसूम असतानाच महायुतीची मात्र जोरदार फलंदाजी सुरू झाली आहे. या उद्घाटना प्रसंगी तिसगाव येथील नेते विक्रममामा ससाणे यांनी कुशल भापसे यांची “भावी जिल्हा परिषद सदस्य”म्हणून घोषणाच करून टाकली आणि तिसगाव जिल्हा परिषद गटात महायुती तर्फे निवडणूकीचे अप्रत्यक्ष रित्या रणशिंगच फुंकले आहे.तिसगाव जिल्हा परिषद गटात युवा नेते कुशल भापसे नेमका कोणाचा त्रिफळा उडवणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.तिसगाव जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे.तो पर्यंत “भापसे सेनेने” प्रचाराची पहीली फेरी पूर्ण केली आहे.तिसगाव जिल्हा परिषद गटातील भापसे सेनेची कामगिरी पाहता महायुतीच्या पक्षश्रेष्ठींना निश्चितच उमेदवारी साठी विचार करायला लावणारी गोष्ट निर्माण झाली आहे.जिल्हा परिषद निवडणुकीचा धुराळा उडण्या आधीच भापसे सेना क्रिकेटच्या मैदानात शड्ड ठोकून उभी राहिली आहे. कुशल भापसे यांनी विविध खेळासह वेगवेगळ्या शासकीय योजनेच्या माध्यमातून तिसगाव जिल्हा परिषद गटात प्रत्येक गावातील घराघरात शिरकाव केला आहे. निवडणुकीचे ढोल वाजवायला लागले की मीच कसा लायक उमेदवार आहे हे पक्षश्रेष्ठींना सांगून उमेदवारी मिळवण्या साठी अनेकांची स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदरच कुशल भापसे यांनी खेळाच्या मैदानासह राजकीय मैदान गाजवायला सुरूवात केली आहे.आणि स्वकीयासह व विरोधी स्पर्धकांची राजकीय व्युहरचना करून राजकारणाची हवाच काढून टाकली आहे.युवानेते कुशल भापसे यांची उमेदवारी जाहीर होण्या आधीच स्पर्धकांच्या तंबुत मात्र अतिशय घालमेल सुरु झाली आहे.नेमकं कुशल भापसे यांच्या भापसे सेनेला कसं आवरायचं हाच मोठा प्रश्न सर्व सांभाव्य उमेदवारापुढे निर्माण झाला आहे.जिल्हा परीषद निवडणुकीचे घोडा मैदान जसं जसे जवळ येत आहे तसं तसे स्पर्धेतील सांभाव्य उमेदवारांच्या छातीचे ठोके वाढू लागले आहेत.

























