तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत श्री. गो. से. हायस्कूल पाचोराचे उत्तुंग यश

तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत श्री. गो. से. हायस्कूल पाचोराचे उत्तुंग यश

सतरा वर्षाखालील मैदानीच्या शासकीय क्रीडा स्पर्धेत गो से हायस्कूल पाचोरा च्या विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश. आज पाचोरा येथे एम.एम.महाविद्यालयाच्या क्रीडांगणात संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेत च्या सतरा वर्षाखालील मयूर प्रकाश सुर्यवंशी इ.१०वी ड या विद्यार्थ्यांने १००मी. धावणे व २०० मी. धावणे या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत विजेतेपद प्राप्त केले.या विद्यार्थ्यांस व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व क्रीडा शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ संस्थेचे चेअरमन संजय वाघ व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही टी जोशी मानद सचिव ऍड महेश देशमुख शालेय समिती चेअरमन खालील देशमुख तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पी. एम वाघ उपमुख्याध्यापक श्री. एन आर ठाकरे पर्यवेक्षक श्री. आर एल पाटील पर्यवेक्षक श्री ए बी अहिरे यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री. संजय दत्तू सर व महेश चिंचोले सर यांचे अभिनंदन केले व जिल्हास्तरीय सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात.