चोपडा महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मता दिन व स्व. इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

चोपडा महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मता दिन व स्व. इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘राष्ट्रीय एकात्मता दिन’ व देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय ‘इंदिरा गांधी यांची जयंती’ साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांच्या हस्ते स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, प्रा.एम.जी.पाटील, डॉ.बी. एम.सपकाळ, डॉ.एस.आर.पाटील, डॉ.एम.एल. भुसारे, श्री.डी.डी.कर्दपवार, डॉ.आर.आर.पाटील, श्री.वाय.एन.पाटील आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ.पी.के लभाने यांनी केले.याप्रसंगी श्री.बी.एच.देवरे यांनी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी केलेल्या कार्यांचा तसेच त्यांनी राबविलेल्या विधायक धोरणांचा परिचय करून दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री.बी. एच.देवरे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.संदीप पाटील, श्री.प्रदीप बाविस्कर, श्रीमती विशाखा देसले, सेजल देवरे, संदीप अहिरराव, प्रकाश पाटील, अनिल पाटील, सोहम पाटील, महेंद्र पाटील, गणेश कोळी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.